weather effect on toor and grams crop in yavatmal 
विदर्भ

शेतकऱ्यांनो! तूर, हरभरा पिकांना जपा; अन्यथा येईल पश्चातापाची वेळ

चेतन देशमुख

यवतमाळ : खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास गेलेल्या शेतकऱ्यांवर दररोज नवीन संकटे येत आहेत. त्यानंतर आता ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामाचे पीक अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. या वातावरणाचा गहू, तूर व हरभरा यांसह इतर पिकांनाही फटका बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना जपावे, असे आवाहन कृषितज्ज्ञांनी केले.

जिल्ह्यात जवळपास दोन लाख हेक्‍टरवर रब्बी हंगामातील पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. आतापर्यंत शभंर टक्के पेरणी आटोपलीदेखील आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याचा परिणाम तूर व हरभरा या पिकांवर होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. काही भागांत पाऊस झाला. त्यानंतर आता धुक्‍याची चादर पसरत आहे. अशा परिस्थितीत शेतपिकांचे नुकसान होण्याचा धोका आहे. तुरीचे पीक सध्या अनेक ठिकाणी बहरावर आलेले आहे.

काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा या पिकाला काही ठिकाणी फुलेदेखील आलेली दिसत आहेत, तर गहू काही ठिकाणी फुलं सोडण्याच्या अवस्थेत तथा पोटरीवर आहे. काही आंबा मोहरीवर सुटले आहेत. अशा अवस्थेत दोन-तीन दिवस ढगाळी वातावरण राहिल्यास पिकांवर अनिष्ट परिणाम होईल. पराग सिंचनाअभावी व किडींचा प्रादुर्भाव यामुळे तुरीवरील फुलांची गळती होण्याची दाट शक्‍यता आहे. धुक्‍याचे परिणाम टाळण्यासाठी पहाटे व संध्याकाळ धूर पेटविणे गरजेचे आहे. तूर व हरभरा पिकांवर किडींचा प्रादुर्भावाविषयी शेतकऱ्यांनी अधिक जागरुक राहावे, असे आवाहन कृषितज्ज्ञांनी केले आहे. 

आर्थिक नुकसानीच्या पातळीवर म्हणजे तुरीवर दोन आळ्या प्रतिझाड व हरभऱ्यावर दोन अळ्या प्रतिमीटर इतके आढळून आल्यास स्पर्शजन्य व लेबल क्‍लेम नोंदणीकृत कीटकनाशकांची फवारणी करावी. धुक्‍याचा परिणाम कमी होण्यासाठी पिकाला हलके ओलित करावे.
- डॉ. प्रमोद यादगिरवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

Bidkin Bribe Case : बिडकीन ग्रामीण रुग्णालयात लाच प्रकरण उघड; वैद्यकीय अधीक्षकासह दोघे जाळ्यात, परिसरात खळबळ

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Loha News : संतोष म्हणतो आणि फिरून जन्मेन मी..! भारसावडेकरांनी घेतला पुढाकार

KKR vs PBKS Live: इडन गार्डनवर मुसळधार पाऊस... ५-५ षटकांची होणार मॅच, जाणून घ्या cut-off time, लाईव्ह अपडेट्स

SCROLL FOR NEXT