high-temperature
high-temperature 
विदर्भ

Weather Forecast : तापमान वाढले! नागरिकांनी काळजी घेण्याचे आरोग्‍य अधिकाऱ्यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

अकोला : उष्‍माघातापासून बचवा करण्यासाठी प्रतिबंधात्‍म उपाय योजना करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी उन्हात घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन अकोला महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.अनुप चौधरी यांनी केले आहे.

शेतावर अथवा इतत्र मजुरीचे कामे फार वेळ करणे, कारखाण्‍याच्‍या बॉयलर रूममध्‍ये काम करणे, काच कारखाण्‍यातील कामे करणे, जास्‍त तापमानाच्‍या खोलीमध्‍ये काम करणे, घट्ट कपड्याचा वापर करणे अशा प्रत्‍यक्ष उष्‍णतेशी अथवा वाढत्‍या तापमानातील परिस्थितीत सतत संबंध आल्‍याने उष्‍माघात होण्याची शक्यता असते.

त्यापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे, घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा. दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळणे, सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा.

हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवाणे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घेणे किंवा घरी बनलेली लस्सी, केरीचे पन्‍हे, लिंवू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा, अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.

उष्‍माघातीची लक्षणे

थकवा येणे, ताप येणे, त्‍वचा कोरडी पडणे, भुक न लागणे, चक्‍कर येणे, निरूत्‍साही होणे, डोकेदुखी, रक्‍तदाब वाढणे, मानसिक व शारीरीक अस्‍वस्‍थतता, बेशुध्‍दावस्‍था ईत्‍यादी.

घरगुती उपचार

रुग्‍णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत शक्‍य असल्‍यास वातानुकुलीत खोलीत ठेवावे, रूग्‍णाचे शरीराचे तापमान खाली आणण्‍याचे दृष्‍टीने प्रयत्‍न करावे, रुग्‍णास बर्फाचे पाण्‍याने आंघोळ घालावी, रूग्‍णाचे कपाळावर थंड पाण्‍याच्‍या पट्ट्या ठेवाव्‍यात, आईस पॅक लावावेत, रुग्‍णाची प्रकृती गंभीर झाल्‍यास तत्‍काळ नजीकच्‍या दवाखान्‍यात उपचारार्थ दाखल करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dabholkar Murder Case: दाभोलकर खून प्रकरणी मोठा निकाल ! तिघे निर्दोष .. दोघांवर गुन्हा सिद्ध

Narendra Dabholkar Case Live Updates: दाभोलकरांच्या हत्या प्रकरणी अंदुरे, कळसकरला जन्मठेप

Suresh Jain: ठाकरे गटाच्या माजी मंत्र्याने लोकसभेच्या धामधुमीत केला जय महाराष्ट्र! काय सांगितलं कारण ?

Axis Bank: धक्कादायक! ॲक्सिस बँकेची 22 कोटी रुपयांची कर्ज फसवणूक! कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Watch Video: चक्क जन्मठेपेची शिक्षा झालेले 9 कैदी तुरुंगातून पास झाले बारावीची परीक्षा

SCROLL FOR NEXT