file photo
file photo 
विदर्भ

बरं, ...घोडे किती पाठवणार? 

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : 'नमस्कार, तुम्ही उमेदवार बोलत आहात का...? 'हो... मीच बोलतो; तुम्ही कोण..? तिकडून उत्तर मिळाले 'मी या पालिकेत सदस्य आहे.' 17 डिसेंबरला नियोजनची निवडणूक आहे ना! , 'हो... तुम्ही उमेदवार आहे...?, त्यावर उत्तर मिळाले 'हो..', मग आमच्याकडे पण लक्ष असू द्या...तुम्हीच निवडून येणार... बरं, घोडे किती पाठवणार...?' असा संवाद फोनवर एका उमेदवाराशी ुसरू होता. त्यावर 'अरे तुम्ही विधान परिषद निवडणूक लढत आहात ना? मग काय विचारता...' हा प्रसंग विनोदाचा ठरला. नियोजन समितीच्या निवडणूक रिंगणात असलेल्या एका उमेदवाराला चक्क विधान परिषदेचा (एमएलसी) उमेदवार समजून समोरील व्यक्ती किती घोडे पाठवणार असा प्रश्‍न विचारत होती. मात्र, त्यांनी मी 'एमएलसी'चा उमेदवार नसून नियोजन समितीचा असल्याचे सांगितल्यावर समोरच्या व्यक्तीचा एकच गोंधळ उडाला. आणि उमेदवाराने तर चक्क डोक्‍यावरच हात मारून घेतला.

नगरसेवकांचा अर्ज कायम 

जिल्हा नियोजन समितीमधील लहान नागरी क्षेत्र मतदारसंघातील एका जागेसाठी मंगळवारी (ता. 17) निवडणूक होत आहे. एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. पांढरकवडा, यवतमाळ तसेच उमरखेड पालिकेतील प्रत्येक एक नगरसेवकांचा अर्ज कायम आहेत. यामुळे प्रचारासाठी उमेदवारांनी नगरसेवकांना संपर्क साधणे सुरू आहे. मात्र, दरम्यान आता नवनवीन किस्से घडत आहेत. स्थानिक स्वराज्य मतदारसंघ विधान परिषदेची जागा रिक्त झाल्याने ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. निवडणूक कधी लागणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. 

 
नियोजन'ची निवडणूक लागली

सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे केंद्रीत झाले आहे. अशातच "नियोजन'ची निवडणूक लागली. यामुळे काहींच्या मनात विधान परिषदेची निवडणूक असल्याचा समज झाला. यामुळे तीन उमेदवारांपैकी एका उमेदवाराला नगरसेवकांनी विजयाच्या शुभेच्छा तर दिल्या. त्याचबरोबर "घोडे'किती पाठविणार, अशी थेट विचारणा केली. यावर संबंधित उमेदवाराला "हसावे की रडावे' हेच आधी समजले नाही. संबंधितांची समजूत काढताना उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. यावरून विधान परिषद निवडणुकीसाठी किती आतुरता आहे, हे लक्षात येते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT