Who is the prince praised by the Chief Minister? tiger news 
विदर्भ

मुख्यमंत्र्यांनी स्तुती केलेला ‘राजकुमार’ आहे तरी कोण? त्याचा उपवास होता म्हणून बरं झाल असं का म्हणाले?

नीलेश डाखोरे

नागपूर : ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे’ उद्घाटन करण्यापूर्वी मी जंगल सफारी केली. यावेळी सोबत असलेल्या गाईडने ‘आपलं नशीब चांगल असेल तर बिबट नक्की दिसेल’ असे म्हटले होते. माझे नशीब खरचं चांगले असल्यामुळे बिबटही दिसला आणि ‘राजकुमार’ही. ‘बरं झाल त्या दिवशी ‘राजकुमार’चा उपवास होता; नाही तर...’ असे स्तुती करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे’ उद्घाटन करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जंगल सफारीचा आनंद घेतला. यावेळी त्यांना बिबट व राजकुमार दिसल्याचे त्यांनी उद्घाटन कार्यक्रमात सांगितले. काय सुंदर नाव आहे ‘राजकुमार’. राजकुमार हा माणूस फ्रेंडली आहे.

तो एकदा लग्नाच्या वरातीत गेला होता असे मी ऐकले. मात्र, त्याने कोणावरही हल्ला केला नाही. कोणाचीही शिकार केली नाही. ‘राजकुमार’चा उपवाच होता त्या दिवशी, हे नशीब. नाही तर काय झाल असते काय माहिती, असे गमंत करताना मुख्यमंत्री म्हणाले.

तीन वर्षांपूर्वी मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सिमेवर असणाऱ्या मासुलखापा गावात असलेल्या लग्नाच्या मंडपात राजकुमार गेला होता. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात बावनथडी धरण्याच्या शेजारी हे गाव बसले आहे. येथे एक लग्न समारंभ पार पडणार होता. यामुळे नागरिकांची जांगलीच गर्दी जमली होती. मात्र, थेट लग्न समारंभात वाघ शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

परिसरात काही दिवसांपासून वाघाची भटकंती सुरू होती. तसाही हा परिसर जंगलव्याप्त आहे. वाघ लग्नसमारंभात शिरल्याने चांगलीच चर्चा रंगली होती. काही दिवस हा वाघ चर्चेचा झाला होता. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘राजकुमार’ची स्तुती केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला. मुख्यमंत्र्यांनी वाघाच्या नावाची स्तुती करतानाच हा वाघ माणूस फ्रेंडली असल्याचे सांगितले.

वाघाला साजेसे काम करणे गरजेचे

‘राजकुमार’ची स्तुती करतानाच मुख्यमंत्र्यांनी माणसाचा स्वभाव हा वाघासारखा असला पाहीजे असे सांगितले. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे जगाव तर वाघासारख. त्यामुळेच आमचा झेड्यावरसुद्धा वाघाचा लोगो आहे. त्यामुळेच वाघाला साजेसे काम करणे गरजेचे झाले आहे. वाघासारखे काम केल्यानंतर ‘वाघ आला रे वाघ आला’ असे म्हटले तरी विरोधकांची दाणादाण उडेल, असा मिश्किल टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर कायम, 'या' जिल्ह्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Paithan Accident: पेट्रोल भरण्यासाठी कार वळवली, पण क्षणात काळाचा घाला; पाचोडजवळ कंटेनरच्या धडकेत दोघे ठार, एक जण गंभीर

करकायदा : रिट्स, इन्व्हिट्सवरील लाभांश करमुक्त

स्मार्ट माहिती : आयटी व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार यांच्यात दरी

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पत्राने कोंडी फुटली; झारखंडमध्ये सरकार-विद्यार्थी आंदोलकांमध्ये आज निर्णायक चर्चा

SCROLL FOR NEXT