Tiger 
विदर्भ

वाघिणीच्या मृत्यूस जबाबदार कोण?

रामरतन गजभिये

देवलापार - पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. ४९८ मध्ये बांद्रा तलाव क्र. १ येथे एका चार ते पाच वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाला. ही वाघीण गेल्या आठ दिवसांपासून गाळात फसून होती. भुकेने तसेच पाणी न मिळाल्याने तिने तडफडून प्राण सोडले हे स्पष्ट झाले आहे. मात्र त्या वाघिणीच्या मृत्यूस जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे.

नियमित गस्त करीत असताना वनपाल जीवन पवार आणि इतर वनरक्षक यांना एक प्रौढ वाघीण चिखलात रुतलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आली,  अशी माहिती वनविभागामार्फत दिली जात असली तरी या वाघिणीचा मृत्यू आठ दिवसांपूर्वी झाला. तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला.

याबाबत जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या ठिकाणी पाण्यासाठी केलेले मोठे डबके होते. त्या डबक्‍यात मध्यभागी थोडे पाणी होते. ते पाणी पिण्यासाठी ही वाघीण त्या डबक्‍यात शिरली. खड्डा खोल असल्याने ती तेथेच गाळात फसून राहिली. किमान तीन दिवस तरी ती तडफडत राहिली असावी. कारण इतक्‍या लवकर तर तिचा मृत्यू होऊ शकत नाही. त्यानंतर तडफडत ती मरण पावली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कालांतराने ती वाघीण फसल्यानंतर डबके वाळत गेले. त्या वाघिणीला कुदळी पावड्याने खोदून काढावे लागले. याचा अर्थ या ठिकाणी गस्त केली जात नाही, हे स्पष्ट होते. वाघाच्या संरक्षणासाठी कोट्यवधींचा खर्च होत आहे, त्याचे काय, असा प्रश्‍न परिसरात होत आहे.

वनअधिकारी पर्यटकांत तल्लीन
वनपरिक्षेत्र हे मानसिंगदेव अभायारण्यात येते. येथे हमखास वाघ दिसतो, म्हणून मोठ्या प्रमाणात पर्यटक जंगलसफारीकरिता येतात. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा जास्त वाहने सोडण्यात येतात. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. तर निर्धारित वेळेच्या व्यतिरिक्त कोणत्याही वेळी गाड्या सोडण्यात येतात. यातून मोठ्या प्रमाणात वसुली केली जाते. त्यातच वनपरिक्षेत्र अधिकारी व्यस्त असतात. त्यामुळे त्यांचे जंगलाच्या दिशेने लक्ष नसते.

घटनास्थळाजवळच निरीक्षण कुटी
ज्या ठिकाणी वाघिणीचा चिखलात रुतलेला मृतदेह आढळला त्या ठिकाणापासून केवळ साठ मीटरवर निरीक्षण कुटी आहे. या कुटीवर चोवीस तास वनमजूर राहतात, असे वनविभागातर्फे सांगितले जाते. परंतु ही वाघीण मरून आठ दिवस झाले तरी चार दिवस चिखलात फसून असताना वनविभागाच्या कसे लक्षात आले नाही, हा प्रश्न आहे. मानसिंगदेव अभयारण्य खुर्सापार गेटपासून काही अंतरावर पाणवठ्यावर झालेल्या वाघिणीचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी तीन मजली निरीक्षण कुटी आहे. त्याच भागात तीन जुन्या लाकडी कुट्या आहेत. तेथे कर्मचारी चोवीस तास तैनात असतात. परंतु जवळपास दहा ते बारा दिवस तिकडे कोणी भटकलेच नाही काय, असा सवाल करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return : वेलकम शुभांशु! अंतराळात तिरंगा फडकवून पृथ्वीवर परतले शुभांशु शुक्ला, कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर केलं लँडिंग

Mumbai Rain: मुंबईत जोरदार पाऊस! अनेक भागात पाणी साचले, विमानांचे वेळापत्रक बिघडले अन्...; जाणून घ्या स्थिती

Crime News: धावत्या बसमध्ये प्रसूती; नवजात बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची अमानुष घटना

Mumbai News: मुंबईतील २० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याची चौकशी करा, भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी

Shubhanshu Shukla Return Live : अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले

SCROLL FOR NEXT