file photo 
विदर्भ

यवतमाळमधील घंटागाड्या जागच्या जागीच का थांबल्या… हे आहे कारण... वाचा सविस्तर

रवींद्र शिंदे

यवतमाळ : कचरा कंत्राटदारांनी तीन महिन्यांचे वेतन न दिल्याने शहरातील कचरा संकलन करण्याऱ्या घंटागाड्या या वाहनाच्या चालकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, या वाहनचालकांनी येथील नगरपालिका इमारतीसमोर आपली वाहने उभी केल्याने पुन्हा एकदा या वाहनांना ‘ब्रेक' लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

यवतमाळ शहरातील कचरा संकलन करणाऱ्या या वाहनांच्या चालकांचा वेतनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. कंत्राटदार बदलून गेल्यानंतरदेखील कर्मचाऱ्यांचे प्रश्न अजूनही सुटलेलेले दिसत नाहीत. संचारबंदीच्या काळातदेखील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची कामे केलीत. मात्र, या कामगारांना अजूनही वेतन मिळालेले नाही.

अन्यथा पुन्हा आंदोलन करणार

आठ दिवसांपूर्वीच कामगारांनी वेतनाच्या प्रश्नांवर आंदोलन केलेले होते. त्यावेळी समस्या निकाली काढण्याचे आश्वासन नगरपालिकेकडून देण्यात आलेले होते. मात्र, अजूनही या वेतनाच्या प्रश्‍नावर आवश्‍यक तो कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही. त्याचा विपरीत परिणाम म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांवर आपल्या वेतनासाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे.

मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

दरम्यान, याबाबत गांभीर्याने दखल घेऊन आमच्या गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्यात याव्यात व आमचे वेतनही तातडीने देण्यात यावे, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी निवेदनात केली आहे. या मागण्यांचे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले. निवेदन देताना मोहन भगत, विजय घुले, नितीन सयाम, बादल पेठकर, मनोज कबाडे आदी उपस्थित होते.

तीन महिन्यांपासून आर्थिक कोंडी

यवतमाळ शहरातील कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी या वाहनांवरील चालक व सहायक कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आपल्यासह कुटुंबीयांचा गाडा हाकताना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) भरणादेखील करण्यात आलेला नाही. त्यामुळे होणाऱ्या आर्थिक कोंडीतून घंटागाडी वाहनाचे चालक व मदतनीस यांनी हे कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

(संपादन  : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Retirement : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कधी निवृत्त होणार? उत्तराधिकारी म्हणून कोणाचे नाव चर्चेत?

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

SCROLL FOR NEXT