file photo
file photo 
विदर्भ

का झाला नृत्य सरावादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू ? 

सकाळ वृत्तसेवा

वरोरा (जि. चंद्रपूर)  : दिवाळीच्या सुट्या संपल्या की शाळांना वेध लागतात वार्षिक स्नेहसंमेलनाचे. आपलेच नृत्य चांगले व्हावे, यासाठी मुलांकडून मोठ्या प्रमाणात रियाज करून घेतला जातो. परंतु हे करताना मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे. रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या सेंट ऍन्स पब्लिक स्कूलमध्ये नृत्याचा सराव करताना तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 12) दुपारी घडली. मृत विद्यार्थिनीचे नाव ऋचा दातारकर (वय 13) असे आहे. ऋचाचा मृत्यू हायपर कोलेस्टॉलने झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉ. विजय चांडक यांनी व्यक्त केला. 


सेंट ऍन्स एज्युकेशन सोसायटीद्वारे सेंट ऍन्स हायस्कूल व सेंट ऍन्स पब्लिक स्कूल चालविली जाते. शहरालगत असलेल्या बोर्डात ग्रामपंचायतीच्या हद्दीत या दोन्ही शाळा आहेत. सेंट ऍन्स स्कूलला 25 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे येत्या 28 नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कार्यक्रमाच्या अनुषंगाने शाळेची तयारी सुरू आहे.

मंगळवारी (ता. 12) गुरुनानक जयंतीनिमित्त सुटी होती. सुटी असतानाही शिक्षिका सपना यांनी पंधरा मुलींना नृत्याच्या सरावासाठी बोलविले होते. टेमुर्डा येथील ऋचा दिलीप दातारकर ही सातवीची विद्यार्थिनी सरावासाठी आली होती. सराव सुरू असतानाच तिला भोवळ आली. ती खाली कोसळली. उपस्थित शिक्षक-शिक्षिकांनी धावपळ करीत तिला वरोरा येथी चांडक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. विजय चांडक यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. दरम्यान, याची माहिती तिच्या वडिलांना देण्यात आली. तेही तातडीने रुग्णालयात दाखल झाले. अन्य पालकांनीही डॉ. चांडक यांच्या रुग्णालयात मोठी गर्दी केली.

गेल्या काही महिन्यांपासून ही शाळा विविध घटनांनी चर्चेत आहे. त्यात सुटीच्या दिवशी नृत्याचा सराव करताना एका तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. याबाबत सेंट ऍन्स पब्लिक स्कूलचे जनसंपर्क अधिकारी योगेश ठक्कर यांनी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. 

विविध घटनांनी शाळा चर्चेत 
गेल्या काही वर्षांत या शाळेत विविध घटना घडल्या. या घटनांमुळे ही शाळा नेहमीच चर्चेत राहिली. त्यात लहान मुलीस मारहाण, चॉकलेट विक्री प्रकरण, जादा भावाने पुस्तक विक्री, हुक्का प्रकरण, शुल्कवाढसह अन्य काही प्रकरणांचा समावेश होता. आज पुन्हा एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने चर्चा सुरू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT