corona 
विदर्भ

प्रतिबंधित क्षेत्रातील महिलेचा मृत्यू आणि पती पाठोपाठ पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह, नागरिकांमध्ये दहशत

सकाळ वृत्तसेवा

पुसद (जि.यवतमाळ) : मुंबईवरुन परतलेला हुडी येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यानंतर त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आता त्याची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातच बुधवारी सकाळी दीड वाजता हुडी येथील २४ वर्षीय विवाहित महिलेचा अचानक मृत्यू झाला. ती ऊसतोड कामगार असून गेल्या काही महिन्यांपासून ती आजारी असल्याचे सांगण्यात येते. प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने तिचा स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे कळते. तिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. मंगळवारी होम क्वांरटाईनचा  शिक्का असलेल्या हुडी येथील गौतम जळबा कांबळे या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. त्याची उत्तरीय तपासणी करून स्वाब कोविड टेस्टसाठी पाठविण्यात आले. या घटनेमुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
दरम्यान, हुडी येथील कोरोना बाधित कुटुंबातील दोन सदस्य तसेच निंबी येथील चार सदस्यांना आयुर्वेद महाविद्यालयातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून त्यांचे अहवाल अजून प्राप्त व्हायचे आहेत. हुडी येथील कोरोना बाधितांच्या घटनेमुळे प्रशासन सतर्क झाले असून हुडी गावातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या गावातील ३५० कुटुंबांचे रॅपिड सर्वेक्षण सुरू आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, गटविकास अधिकारी शिवाजी गवई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशिष पवार यांच्यासह पोलिस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

सविस्तर वाचा - सुन्न करणारी बातमी, उपासमार असह्य झाल्याने दिव्यांग व्यक्तीची मंदिरात आत्महत्या
पुसद तालुक्यात  मुंबई, पुणे, ठाणे, भिवंडी  या कोरोना हॉटस्पॉटमधून दहा हजाराच्यावर लोक आल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरून आलेल्या लोकांना योग्यरित्या क्वांरटाईन करण्यात यावे, प्रशासनाने लक्ष घालावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

Latest Marathi News Live Update : आजचा दिवस प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुढीपाडव्यानिमित्ताने वक्तव्य

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना दणका! राज्यभरात फळबागांचे मोठे नुकसान; तासभर गारांचा मारा..

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

SCROLL FOR NEXT