Rajura Crime sakal
विदर्भ

Rajura Crime : संशयाच्या वादातून पत्नीची धारदार शस्त्राने हत्या

संशयाच्या भुताने होते झपाटले; घरगुती वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

राजुरा - घरगुती वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. ही घटना रविवार (ता. २६) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास राजुरा तालुक्यातील तुलाणा या गावात घडली. मृत पत्नीचे नाव तुळजाबाई अनिल सेलूरकर असे आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिल सेलुरकर याला अटक केली आहे. आरोपी हा पत्नीवर संशय घेत होता. संशयातून हे हत्याकांड घडल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यात तुलाणा या गावातील अनिल सेलुरकर हा टेलरिंग कारागीर आहे. त्याला दोन अपत्य आहे. सुखाचा संसार सुरू असतानाच त्याला दारूचे व्यसनही जडले. त्यातूनच त्याचे पत्नी तुळजाबाईसोबत नेहमीच खटके उडायचे. तेंदूपत्ता आणण्यासाठी तुळजासोबत कोमल अलोनेही गेली होती. अनिलने तिलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने धावतपळत गाव गाठले. गावकऱ्यांना या घटनेची माहिती दिली.

त्यानंतर गावकऱ्यांनी विरुर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. आरोपी अनिल सेलुरकर हा हत्या करून विरुर पोलिस ठाण्यात जाऊन शरण आला. पोलिसांनी घटनेचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली विरुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष वाकडे या घटनेचा तपास करीत आहे.

बोलता बोलता केला वार

रविवारी सकाळी पत्नी तुळजाबाई गावातील काही महिलांसोबत तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेली. संशयाच्या भुताने झपाटलेल्या अनिलच्या मनात वेगळाच बेत होता. जंगलाच्या रस्त्याने पत्नी तुळजाबाई तेंदूपत्ता घेऊन येत होती. गावाजवळील रस्त्यावर अनिलही तिच्यासोबत होता. तिच्याशी बोलताबोलता त्याने पत्नी तुळजावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कामासाठी इमारतीमध्ये गेले; पण कुत्रा मागे लागला अन्...; सारंच संपलं! पुण्यात 'त्या' इलेक्ट्रिशियनसोबत काय घडलं?

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Latest Marathi News Update LIVE : अनिल देशमुखांच्या मुलाचा शरद पवार गटाला रामराम

Pune Municipal Election : पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार! १० प्रभागातील मतदार संख्या लाखाच्या पुढे, प्रचारात उमेदवारांची होणार दमछाक

SCROLL FOR NEXT