poison 
विदर्भ

पत्नीने केला पतीचाच गेम; शीतपेयात विष देऊन संपविले 

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : दिव्यांग असलेला पती काहीच कामधंदा न करता त्रास देत असल्याने पत्नीने शीतपेयातून विष देऊन त्याचा गेम केला. या घटनेचा उलगडा तब्बल एक महिन्यानंतर करण्यात टोळीविरोधी पथकाला यश आले. 

रामदास ईश्‍वर दहिकर (वय 47, रा. यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी संशयित पत्नी कांचन हिला अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. रामदास यांचा 22 एप्रिल रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. अहवालात मृत्यूचे कारण विषबाधा हे आले होते. दिव्यांग व्यक्तीला कुणी विष दिले, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. लॉकडाउनच्या काळात पोलिस दिव्यांग व्यक्तींच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करीत होते.

मृतकाचे जेवण व त्या पूर्वीच्या हालचालींचा तपास पोलिसांनी सुरू केला. पतीचा मृत्यू झाला असताना पत्नीच्या चेहऱ्यावर दु:ख दिसून आले नाही. त्यामुळे टोळीविरोधी पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांचा संशय पत्नीवर अधिकच बळावला. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेऊन विचारपूस केली. पतीला शीतपेयात विष देऊन संपविल्याची कबुली तिने दिली. पती रामदास हा दिव्यांग होता. कोणतेही काम करीत नव्हता. दोन मुले असून, शिक्षण घेत आहे. कुटुंबाचे पालन पोषण करीत नव्हता. मानसिक त्रास होत असल्याने पत्नीने टोकाचे पाऊल उचलले, अशी कबुली संशयित कांचन हिने पोलिसांत दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT