file photo
file photo 
विदर्भ

शिळी पोळी दिल्याने पत्नीला पेटविण्याचा प्रयत्न

सकाळवृत्तसेवा

नागपूर : जेवणात शिळी पोळी दिल्याचा राग मनात धरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे महिलेचा जीव वाचला. पोलिसांनी पती सुनील प्रभाकर गोडमारे (40, रा. खापरी, पुनर्वसन सेक्‍टर, 26) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
सुनील गोडमारे हा मोलमजुरी करतो. तो पत्नी मीनाक्षी, मुलगा व आईसह राहतो. मीनाक्षी धुणीभांडीचे काम करते. सुनीलला दारूचे व्यसन आहे. पत्नीचे कुण्यातरी युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय सुनीलला होता. त्यामुळे तो कोणत्याही कारणावरून वाद घालून मीनाक्षीला मारहाण करीत होता. शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सुनील दारू पिऊन घरी आला. त्याने पत्नीला जेवण वाढायला सांगितले. स्वयंपाक झाला नसल्याने तिने थोडे थांबायला सांगितले. मात्र, त्याने शिवीगाळ करीत लगेच जेवण वाढून मागितले. त्यामुळे मीनाक्षी यांनी सकाळची पोळी सुनीलला दिली.
"शिळी पोळी का दिली?' या कारणावरून सुनीलने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. शेजारच्या युवकासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करीत तिला बेडरूममध्ये ओढत नेले. तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आईने आरडाओरड केली. त्यामुळे वस्तीतील युवकांनी घराकडे धाव घेतली. मीनाक्षीला सुनीलच्या तावडीतून वाचविले. लगेच पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. बेलतरोडी पोलिसांनी सुनीलविरुद्ध पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. मीनाक्षीवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

SCROLL FOR NEXT