Madya shokin 
विदर्भ

गोंदियात परवानगी मिळताच या `अमृततुल्य` पेयासाठी उडाली लोकांची झुंबड

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : गेली सव्वा ते दीड महिन्यांपासून मद्याचा घोट घशात रिचवण्यासाठी आतुरलेल्या मद्यशौकिनांकरिता गुरुवारचा ( ता. 7) दिवस पर्वणी घेऊनच उजाडला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आठवड्यातील बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे तीन दिवस मद्यविक्रीला परवानगी दिली. परवानगी मिळण्याच्या आज पहिल्याच दिवशी सकाळपासून मद्यशौकिनांनी दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. काही अपवाद वगळता सामाजिक अंतराचे पालन मात्र, प्रत्येकाकडून होत होते. सकाळी 10 ते दुपारी 2 ही वेळ दुकान मालकांना बंधनकारक करण्यात आली. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. लॉकडाउन, संचारबंदी लागू करण्यात आली. या कालावधीत गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्‍यक सेवा वगळता अनेक दुकाने बंद करण्यात आली. यात मद्यविक्रीच्या दुकानांचाही समावेश होता. 3 मे रोजी लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा 17 मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला. गेल्या सव्वा ते दीड महिन्यांच्या या कालावधीत सगळेच लॉक झाले. मद्यशौकिनांचीही घालमेल झाली. अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मार्गदर्शक तत्वानुसार सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या मद्यविक्री आस्थापनांचे व्यवहार 7 मे पासून पुढील आदेशापर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सीएल -2, एफएल -2, एफएल/ बिआर-2, सीएल-3 ( सीलबंद बाटलीतून मद्यविक्री) या आस्थापनांचा यात समावेश आहे. 
आठवड्यातील, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे तीन दिवस तेही सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत मद्यविक्री सुरू ठेवता येईल. हे बंधनकारक राहील. 

विदेशी दारूला अधिक पसंती

दरम्यान, ही दुकाने सुरू होण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी मद्यशौकिनांनी सकाळपासून दुकानांसमोर मोठ्या संख्येने रांगा लावल्या होत्या. जणुकाही ते अमृततुल्य पेयच आहे, ज्यासाठी लोकं एवढी गर्दी करीत आहे, असे वाटत होते. मद्य विक्रेते आणि खरेदीदारांनीही अपवाद वगळता सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन केल्याचे दिसून आले. देशी वगळता विदेशी दारूला अधिक पसंती मद्यशौकिनांनी दिल्याचेही आढळून आले. 

असंतोषाचेही वातावरण 

आज, गुरुवारी बुद्ध पौर्णिमा. याच दिवशी प्रशासनाने मद्यविक्रीला परवानगी दिली. त्यामुळे बहुतांश नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. तसे संदेश सोशल मीडियावर फिरत होते. 


गोंदियाच्या दारूवर भंडारेकरांची चांदी 

नागपूर रेडझोनमध्ये तर, भंडारा आरेंज झोनमध्ये आहे. गोंदिया ग्रीनमध्ये पोहोचला आहे. आता गोंदियात दारू विक्री सुरू झाली. त्यामुळे भंडाऱ्यातील मद्यशौकिनांचे चेहरे आनंदले. सीमोल्लंघन करून मद्यशौकीन निर्धारित दिवशी गोंदियाच्या सीमेत पोहोचतील, यात शंका नाही. 

संविधान मैत्री संघाचा प्रशासनाच्या निर्णयाला विरोध 

देशातील दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन 3 मे पर्यंत होते. परंतु, त्यात 17 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. काही सवलतीही देण्यात आल्या आहेत. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दारू दुकाने उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दारू खरेदीसाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी झाली. सामाजिक अंतराचा फज्जा उडाला. अशा परिस्थितीत संविधान मैत्री संघाने नाराजी व्यक्त केली असून हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे म्हणाले, आपण खूप दिवस परिश्रम करून शांतता पाळली, पण दारूची दुकाने उघडून सर्व परिस्थिती पुन्हा विस्कटून गेली. सामाजिक अंतराचा नियम कुठे गेला? 
बुद्ध जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाने ज्याप्रकारे दारूविक्रीला परवानगी देण्याची परंपरा प्रस्थापित केली आहे, हा निर्णय निंदनीय आहे. संविधान मैत्री संघ याला तीव्र विरोध करीत आहे. असे निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT