liquorshop. 
विदर्भ

अमरावतीतील दारू दुकाने उघडणार!

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाले आणि दारू प्रेमींची पंचाईत झाली कारण दारू दुकाने पूर्णपणे बंद करण्यात आली होती. जवळपास दोन महिन्यांनंतर दारूवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आणि थोड्यावेळाकरिता दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि घरपोच दारू मिळण्याचीही सोय झाली,आता मात्र शहरात मद्यविक्रीच्या दुकानांसाठी सम-विषम निकष अंमलात आणण्याचा विचार जिल्हा प्रशासनातर्फे केला जात आहे. कृषी निविष्ठा आणि औषधी दुकानांना मात्र सम-विषम निकषातून सूट राहणार आहे.
लॉकडाउन-5 च्या दिशानिर्देशानुसार आस्थापना उघडण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी महापालिका प्रशासनास दिले होते. त्यानुसार कंटेन्मेंट झोन, मॉल, शोरूम वगळून उर्वरित आस्थापना सम-विषम पद्धतीने सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने निश्‍चित केले. यात शुक्रवारी पहिल्या दिवशी काहीसा गोंधळ दिसून आला. नागरी परिसरात एकटी असलेली काही किराणा दुकाने सम-विषम पद्धतीत बसत नाहीत, असे सांगत बंद करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र गोंधळाची स्थिती लवकरच दूर होईल, असा विश्‍वास यंत्रणेतील अधिकारी व्यक्त करीत आहेत.
मद्यविक्रीची घरपोच सेवा बंद करून दुकाने सुरू करावी, अशी मागणी विक्रेत्यांकडून केली जात आहे. पुढील टप्प्यात मद्यविक्रीची दुकाने सुरू केली जाण्याची शक्‍यता आहे. या दुकानांनासुद्धा सम-विषम हा निकष लावण्याचा विचार केला जात आहे.
दरम्यान सलूनची दुकाने सुरू करावी, अशी मागणी नाभिक समाजातर्फे करण्यात आलेली आहे. यावर सरकारीस्तरावर निर्णय घेतला जाणार आहे. संबंधितांचे म्हणणे सरकारला कळविण्यात आलेले आहे.
कृषी व औषधी दुकाने वगळणार
कृषी निविष्ठा आणि औषधी दुकानांना सम-विषम निकष लागू राहणार नाही, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. कॉलनी आणि निवासी भागात एकल दुकानांनासुद्धा सम-विषम हा निकष लागू राहणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सविस्तर वाचा - तुमचे मुंढे तर आमचे डॉ. उपाध्याय, सोशल मीडियावर रंगतोय हा सामना
भविष्याच्या दृष्टीने "दयासागर'चा विचार
जिल्ह्यात जुलैमध्ये कोरोना संक्रमणाची जी स्थिती राहणार आहे, त्याअनुषंगाने दयासागर रुग्णालयाच्या क्षमतेचा विकास करण्याच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. सद्यस्थितीतील या रुग्णालयाची सेवा जैसे थे ठेवण्यात आलेली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bhide Bridge Killing : भिडे पुलाजवळ तरुणाचा गळा चिरून खून; पोलिसांनी 'असा' लावला छडा, हातावरील 'टॅटू'मुळं उलगडलं सत्य

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांचा संताप अनावर! कसायाचा थेट शिरच्छेद… गोवधावर असा बसवला कायमचा आळा

IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बेशुद्धावस्थेत अत्याचार अन् हत्या, आदल्या दिवशी विवाहितेशी बळजबरी संबंध; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

Donald Trump India China Controversy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला म्हटले "नरकाचे द्वार", वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जगभर संताप

Petrol-Diesel Price Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण!

SCROLL FOR NEXT