woman cdpo committed to suicide in lakhani of bhandara 
विदर्भ

महिला बालविकास अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, अवघ्या २८ व्या वर्षी संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा

लाखनी (जि. भंडारा) : येथील एकात्मिक बाल सेवा प्रकल्पाच्या युवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी कुटुंबीय झोपी गेल्यावर भाड्याच्या घरी बाथरूममधील लाकडी गजाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. ६)पहाटे ३.३० वाजता उघडकीस आली. शितल अशोक  फाळके  (वय 28 वर्ष रा. पाळडी  ता. कोरेगाव जि. सातारा, हल्ली मुक्काम प्रभाग क्र.५ लाखनी), असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेने महिला व बाल विकास विभागात खळबळ उडाली आहे. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

शितल फाळके या एकात्मिक लाखनी येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून जून २०१७ मध्ये रुजू झाल्या. कार्यालयालगत  माणिक निखाडे यांचे घरी भाड्याने आईसह वास्तव्यास होत्या. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती प्राप्त असल्या तरीही मागील काही दिवसांपासून त्या तणावग्रस्त होत्या. शुक्रवारी (ता.५) कार्यालयात त्या नाराज असल्याचे अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी सांगितले. रात्री जेवण करून माय लेकींनी रात्री अकरा वाजता दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहिले. नंतर झोपण्यासाठी गेल्या.  पहाटेच्या सुमारास आई लघु शंकेसाठी बाथरूममध्ये गेली असता बाथरूममधील लाकडी गजाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत शितल दिसून आली.

आईने आरडाओरड केली असता घर मालक  व आजू बाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना पोलिसांना दिली. लगेच  पोलिस निरीक्षक मनोज वाडीवे सहाय्यक फौजदार विजय हेमने  पोलिस नायक उमेश शिवणकर, महिला पोलीस नाईक वासंती बोरकर, पोलीस शिपाई नितीन झंझाड, चालक मंगेश चाचेरे यांच्यासह पोलिस गाडीने घटनास्थळी दाखल झाले. उपस्थित नागरिकांच्या सहाय्याने प्रेत काढून  उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, संख्यांकिकी विस्तार अधिकारी उमेश खाकसे यांनी भेट दिली. लाखनी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज म्हसकर व त्यांचे सहकारी पोलीस शिपाई मुकेश गायधने करीत आहेत.  अंत्यसंस्कार मृतकाचे  स्वगावी होणार असल्याची माहिती आहे. या घटनेने महिला व बाल विकास अधिकारी या विभागात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT