विदर्भ

विदेशी करन्सी, ३५ हजार पाउंड, डायमंडचा मोह पंधरा लाखांनी नडला

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरातील ५२ वर्षीय महिलेची सोशल मीडियावरून (social media) विदेशी व्यक्तीसोबत झालेली ओळख तिला चक्क १४ लाख ७७ हजारांमध्ये पडली. तोतयाने सेवानिवृत्त महिलेची फसवणूक (Cheating on a woman) केली. प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (woman-cheated-of-Rs-Fifteen-lakh-in-Amravati)

शहरातील अचलपूर मार्गावरील कॉलनीत राहणाऱ्या महिलेची ओळख सोशल मीडियावरून (फेसबुक) एका विदेशी व्यक्तीसोबत झाली. त्या अनोळखी व्यक्तीने स्वत:हून फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविल्यावर महिलेने रिक्वेस्ट स्वीकारली. फेसबुकवरून चॅटिंग नंतर त्यांनी एकमेकांसोबत व्हॉट्अ‍ॅपवरूनसुद्धा चर्चा केली. विदेशी व्यक्तीसोबत झालेल्या मैत्रीमुळे महिला उत्साहित होती. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर अनोळखी व्यक्तीने तिला विदेशातून गिफ्ट पाठवीत असल्याचे सांगितले.

जे गिफ्ट पाठविल्या जाईल त्यामध्ये विदेशी करन्सी, ३५ हजार पाउंड, डायमंडचा समावेश असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने सदर पार्सल पाठविल्याची माहिती महिलेस दिली. त्यानंतर काही दिवसांनी एका व्यक्तीचा तिला फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:ला कस्टम विभागामधून बोलत असल्याचे तिला सांगितले.

आपले पार्सल आले असून, ते सोडविण्यासाठी काही रक्कम पाठविण्यासाठी स्वत:चा खातेक्रमांक दिला. महिलेने त्या खात्यावर काही लाख रुपये पाठविले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी आयकर विभागातून बोलत असल्याचा फोन त्यांना आला. त्यात कर न भरल्यास कारवाईची धमकी देऊन पुन्हा दिलेल्या बँकखात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले.

महिलेने विदेशी मित्राला सात ते आठ टप्प्यांत एकूण १४ लाख ७७ हजार रुपये पाठविले. परंतु, त्यांना विदेशातून आलेले गिफ्ट मिळाले नाही. अनोळखी व्यक्तीने आपली फसवणूक केली, अशी तक्रार महिलेने सायबर ठाण्यात नोंदविली. प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अनोळखी व्यक्तीने पाठविलेली फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारू नये. अशा व्यक्तींसोबत ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणे टाळा. त्यातून फसवणुकीची शक्यता अधिक असते.
- रवींद्र सहाने, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे, अमरावती

(woman-cheated-of-Rs-Fifteen-lakh-in-Amravati)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT