Woman dies in house fire short circuit gadchiroli sakal
विदर्भ

घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून महिलेचा मृत्यू

मागील दोन दिवसांपासून पावसाने वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्याने झाडे पडून वीज खंडित

सकाळ वृत्तसेवा

जारावंडी : जारावंडीपासून पाच किमी दूर असलेल्या दिंडवी येथे सोमवारी (ता. १६) रात्री एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरात असलेल्या महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला. हे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीत जळालेल्या महिलेचे नाव पौर्णिमा उत्तम बल ( वय २९) असून तिला एक मुलगा आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाने वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्याने झाडे पडून वीज खंडित झाली होती. अशात मृतक पौर्णिमा सायंकाळी वीज नसल्याने इनव्हर्टर सुरू करून काम करीत होती.

दरम्यान शॉर्टसर्किट झाल्याने इनव्हर्टरला आग लागली. जवळपास साड्या आणि कपडे होते. विशेष म्हणजे हा परिवार किराणा दुकान चालवितो व सोबतच पेट्रोलची विक्रीसुद्धा करतो. आगीच्या दरम्यान पेट्रोल आणि खाद्य तेल जवळपास असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले व त्या आगीत पौर्णिमा बल हिचा जागीच मृत्यू झाला. आगीची माहिती समजताच गावातील लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत घर बेचिराख झाले होते. या परिवाराचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

जवळचेच गेले मृत्यूच्या दारात....

मृत पौर्णिमाचे पती उत्तम बल यांच्या दु:खाला पारावार उरलेला नाही. तीन वर्षांपूर्वी उत्तम बल यांचे भाऊ अपघातात मरण पावले. हे दुःख आवरत असताना त्यांचे वडील हृदयविकाराने मृत्यू पावले. हा शोक पचवीत असताना आता पत्नीचा जळून मृत्यू झाल्याने बल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : कुणबी प्रमाणपत्रासाठी काटेकोर पडताळणी अनिवार्य - बावनकुळे

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT