woman emloyed whole village from cotton thread through charkha in manjarkhed of amravati
woman emloyed whole village from cotton thread through charkha in manjarkhed of amravati 
विदर्भ

राष्ट्रपित्यांपासून घेतली प्रेरणा अन् अख्ख्या गावाला दिला रोजगार, स्वतःच्या कुटुंबाचाही उदरनिर्वाह

श्रीनाथ वानखडे

मांजरखेड (जि. अमरावती) : अहिसेंचे पुजारी महात्मा गांधी यांची कीर्ती आजही जगभर कायम आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या कार्यापासून प्रेरणा घेवून चांदुर रेल्वे तालुक्यातील निंभा गावातील दहा महिला चरख्याच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. तसेच इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिल्या. सावित्रीबाई फुले सोलर चरखा सुत उत्पादक बचत गटातील महिला गावातच सुत तयार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय अमरावतीअंतर्गत चांदूर रेल्वे तालुका औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेद्वारा मार्गदर्शन घेऊन निंभा येथील सरपंच नंदा गणवीर यांनी सन २०१३ मध्ये गावातील महिलांना एकत्रित करून स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केले. स्वतः सावित्रीबाई महिला बचत गटाची स्थापना  केली. बँकेकडून बचत गटाने पाच लाख अर्थसहाय्य घेऊन सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दहा चरखा यंत्रांची खरेदी केली. गत सहा-सात वर्षांपासून हे कार्य अविरतपणे सुरू आहे. सुरुवातीला या बचत गटातील महिला शेतात मजुरी करत होत्या. आता मात्र स्वतः घरातील काम आटोपून दिवसभर सूत कताईचे काम करतात. काम अधिक तेवढा रोजगार अधिक या तत्त्वावर पैसा मिळत असल्याने गटातील प्रत्येक महिला जास्तीत जास्त काम करून रोजगार मिळवीत आहेत.

वेळूपासून सूत निर्मिती-
एमआयडीसी अमरावती येथून कापसाचे वेळू (कच्चा माल) बचत गटातील महिलांना  गावात घरपोच आणून दिले जातात. मग या महिला सौर चरख्याच्या माध्यमातून त्यावर परिश्रम घेवून पक्का धागा तयार करतात. तयार झालेला पक्का माल पुन्हा अमरावती येथे पाठवून त्यापासून खादी कापडाची निर्मिती केली जाते.

परिश्रमाचे समाधान - 
यापूर्वी बचत गटातील महिला शेतात काम करायच्या. पण तेव्हा बाराही महिने रोजगार मिळत नव्हता. आता मात्र सूतकताई कामामुळे बाराही महिने रोजगार मिळत आहे. महिन्याला किमान तीन ते चार हजार रुपयांपर्यंतचा रोजगार गावातच उपलब्ध झालेला आहे. 
-नंदा गणवीर, अध्यक्ष, सावित्रीबाई फुले महिला बचत गट, निंभा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT