marriage bait.jpg 
विदर्भ

लग्नाचे आमिष दाखवून चक्क महिलेला नेले पळवून

सकाळ वृत्तसेवा

मानोरा (जि.वाशीम) : तालुक्‍यातील वसंतनगर पोहरादेवी येथील 35 वर्षीय घटस्फोटीत महिलेचे लग्न दुसऱ्या ठिकाणी जुळवून देतो असे आमिष दाखवून महिलेला पाहुणी म्हणून सोबत नेले. परंतु अनेक दिवसांपासून पीडित महिलेचा पत्ता लागत नसल्यामुळे शनिवारी (ता.14) मानोरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादीने तक्रारीत म्हटले की, माझ्या मुलीचे सन 2004 रोजी लग्न झाले. परंतु मुलीचे तिच्या नवऱ्यासोबत पटत नव्हते. तेव्हापासून माझ्याच घरी होती. 15 फेब्रुवारी 2020 रोजी नातेवाईक असल्याकारणाने पाहुणी म्हणून नेले व तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी जुळवून देतो असे आमिष दाखवून आरोपींनी तिला सोबत नेले. अनेक वेळा फोनद्वारे माझ्या मुलीसोबत बोलायचे होते. परंतु आरोपी टाळाटाळ करीत होते. 

संशय आल्यावरून आरोपींच्या घरी गेलो असता ती मिळून आली नाही. नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता तिकडेही नसल्याकारणामुळे आरोपी प्रेमसिंग नरसिंग राठोड आणि विरू प्रेमसिंग राठोड यांनी बेपत्ता केल्याची फिर्याद मानोरा पोलिस स्टेशनला देण्यात आली. याप्रकरणी आरोपी प्रेमसिंग नरसिंग राठोड व विरू प्रेमसिंग राठोड (रा. चिखलदारा जि. अमरावती) यांचे विरूद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास मानोरा पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मल्लिकार्जुन खरगेंच्या 'त्या' विधानावरून वाद पेटला! अमित शहांसह भाजपचे नेते आक्रमक; म्हणाले...

Pune News: माळेगावात वनपाल सहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ; शेतातील माती वाहतुकीत अडथळा न आणण्यासाठी मागितले पैसे

MI NEXT CAPTAIN: मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण? माजी खेळाडूने सांगून टाकलं नाव; रोहित शर्मा अन् हार्दिक पांड्याबद्दल मोठं वक्तव्य!

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT