woman give job to 500 other women through cow dung lamp business in yavatmal
woman give job to 500 other women through cow dung lamp business in yavatmal  
विदर्भ

भावाचा अपघात झाला अन् गृहद्योग सुरू केला, आज ५०० पेक्षा अधिक महिलांना देताहेत रोजगार

राधिका आव्हाड

यवतमाळ - परिस्थिती अनेकांना बदलते. मात्र, संघर्ष करत परिस्थिती बदलणारा एखादाच असतो. त्यापैकी एक म्हणजे यवतमाळमधील भाम्ब या गावातील निलीमा पाटणकर. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्यांनी गृहउद्योगातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. आज त्यांच्यासोबत ५०० महिला काम करत असून रेशीम धाग्यापासून ज्वेलरी, बकरीच्या दुधापासून साबण, फिनाईल तयार करण्याचे काम त्या करतात. यासोबत ग्रामीण भागात गाईच्या शेणापासून दिवे तयार करण्याचे कामही त्यांनी सुरू केले आहे. 

एका प्रसंगामुळे व्यवसाय करण्याची जिद्द -
निलीमा यांचा जन्म भाम्ब या छोट्याशा खेड्यात झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे त्यांना फक्त दहावीपर्यंतच शिक्षण घेता आले. त्यानंतर त्यांचे लग्न झाले. सासरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांना तिथेही संघर्षच करावा लागला. मात्र, त्यांनी जिद्दीने बीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर खासगी नोकरीसाठी घराबाहेर पडल्या. याचदरम्यान, निलीमा यांच्यावर मोठे संकट आले. त्यांच्या भावाचा अपघात झाला. त्यावेळी घरी पैसा नव्हता. भाऊ मरणाच्या दारात असल्याने दुसऱ्यांकडे मदतीसाठी हात पसरावे लागत होते. त्यावेळी त्यांनी निश्चय केला की आपण स्वतःचा काहीतरी धंदा सुरू करून सक्षम व्हायचे.

नोकरीतून मिळणाऱ्या पैशांवर त्यांनी भावाचा जीव वाचविला. मात्र, त्यांच्या तुटपुंज्या पगारात सर्वांचा उदरनिर्वाह होत नव्हता. त्यामुळे त्यांनी १० महिलांचा गट तयार केला. त्यामधून त्यांनी रेशीम ज्वेलरी, बकरीच्या दुधापासून साबण, फिनाईल तयार करणे आदी काम सुरू केले. त्यानंतर रेशीम धाग्यापासून अलंकार बनविण्याचे काम केले. यामधून निलीमा यांना आर्थित पाठबळ तर मिळालेच; मात्र त्यांच्यासोबत असलेल्या ५०० महिलांना देखील आर्थिक मदत मिळाली.  याचबरोबर त्यांनी बकरी बँक या  योजनेच्या  माध्यमातून ग्रामिण भागातील शेतकरी, कष्टकरी यांना रोजगार मिळवून  दिला आहे. आता नव्याने ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून गोधन निर्मित (गायीच्या शेणापासून) पंचगव्य दिव्याची निर्मिती केली जात आहे. कामगार, नोकर वर्गाला लॉकडाऊनचा फटका बसला. मात्र, नीलीमा यांच्या गोधन निर्मित पंचगव्य दिव्याच्या माध्यमातून आज महिलांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. 

माझ्या संघर्षामुळे आज मी सक्षम झाली. मात्र, माझ्यामुळे माझ्या शेकडो भगिनी आर्थिकरित्या सक्षम झाल्याचे समाधान वाटत असल्याचे निलीम सांगतात. तसेच भविष्यात ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे निलीमा यांनी सांगितले. दरम्यान, त्यांना सकाळ माध्यम समूहाच्या 'तनिष्का' व्यासपीठाची मदत मिळाली. त्यामुळे त्यांनी सकाळचे आभार मानले. 

संपादन - भाग्यश्री राऊत 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT