मृतकांच्या घरासमोर पंचनामा करतांना आर्णी पोलीस मृतकांच्या घरासमोर पंचनामा करतांना आर्णी पोलीस
विदर्भ

चोरी गेलेल्या बंदुकीतून गोळी झाडून खून; सुनेला घेतले ताब्यात

शुक्रवारी रिव्हॉल्व्हर व सात जिवंत काडतूस चोरीला गेले होते

सकाळ वृत्तसेवा

आर्णी (जि. यवतमाळ) : तीन दिवसांपूर्वी सेवानिवृत्त सैनिकाच्या घरून चोरी गेलेल्या बंदुकीच्या गोळीने आशा किसनराव पोराजवार (वय ६०) या महिलेचा मृत्यू (Woman Murder) झाला. ही घटना सोमवारी (ता. २४) सकाळी साडेनऊ वाजतादरम्यान आर्णीतील मुबारकनगरात घडल्याने खळबळ उडाली आहे. सदर महिलेवर तिच्या मोठ्या सुनेनेच गोळी झाडल्याचा आरोप छोट्या मुलाने केल्याने मृताची सून सरोज उर्फ बबली अरविंद पोराजवार हिला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. (Woman murdered by stolen revolver of retired soldier)

प्राप्त माहितीनुसार, आशा पोराजवार या सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. त्यांना उपचारासाठी आर्णीतील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू (Woman Murder) झाला होता. माहिती मिळताच आर्णी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. स्वयंपाकखोलीतून बंदूक, दोन निकामी काडतुसे आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

मात्र, आशा पोराजवार यांच्यावर गोळी झाडणारा आरोपी कोण, हे लगेच कळू शकले नाही. महिलेवर ज्या बंदुकीतून गोळी झाडली गेली, ती गोळी सेवानिवृत्त सैनिक प्रभू गव्हाणकर यांच्या चोरी गेलेल्या बंदुकीमधील आहे. शुक्रवारी (ता. २१) गवहाणकर यांच्या घरून बंदूक व सात जिवंत काडतुसे चोरीला गेली होती. गव्हाणकर यांच्या घरासमोरच मृत महिलेचे घर आहे.

घरात वहिनी व आई यांच्यात नेहमीच लहानसहान कारणातून वाद होत होते. त्यामुळे वहिनीने गोळी झाडून आईचा खून (Woman Murder) केला, असा संशय मंगेश पोरजवार याने आर्णी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून व्यक्त केला आहे. बंदूक चोरीला गेली, त्यावेळीही वहिनीकडे याबाबत विचारणा केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. या तक्रारीवरून पोलसांनी मंगेशची वहिनी सरोज हिला ताब्यात घेतले आहे.

घटनास्थळावर दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिलखेकेकर, ठाणेदार पितांबर जाधव, सहायक पोलिस निरीक्षक नागेश जायले, पोलिस उपनिरीक्षक किशोर खंदार, योगेश सुकलवार, विजय चव्हाण, मनोज चव्हाण, मिथुन जाधव, राजेंद्र सरदारकर, मारोती मदने, सुनील काबंळे, अमित मेश्राम यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT