woman sale curd regularly from last 35 years in Yavatmal district  
विदर्भ

चंद्रभागाचा दहीहंडा! 'ती' माउली डोक्यावर दह्याचा नव्हे संसाराचा उचलते हंडा; आयुष्यात उमेद जागवणारी कहाणी  

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : स्त्री ही ऊर्जेचा सागर आहे. कष्टावर अपार प्रेम करणारी स्त्री जीवनात कधी हार मानत नाही. संकटांचा डोंगर चढून जाण्याची उदंड शक्ती तिच्या ठायी असते. पुसदजवळच्या कोपरा येथील चंद्रभागा नथ्थू मोटे या रणरागिनीने तरुणपणी वैधव्य आल्यानंतर लुगड्याच्या पदरा सोबत दह्याचा हंडा डोक्‍यावर घेत आयुष्यभर नवी उमेद जागवली. अवघ्या पासष्ठीतही तिने कष्टाने संसाराच्या गाड्याची बिकट वाट सुकर केली.

नवरात्रात आदिशक्तीच्या पूजनाचा उत्सव सगळीकडे सुरू असतो. मात्र, कोपरा येथील चंद्रभागा मोटे या ज्येष्ठ महिलेने आपल्या दहीविक्रीच्या कामाचा जागर कायम सुरू ठेवला आहे.

पुसद शहराच्या चार किलोमीटरवर कोपरा नावाचे गाव आहे. या गावात दूध-दुभत्याचा व्यवसाय घरोघरी चालतो. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी चंद्रभागा कोपऱ्यात सून म्हणून आल्या. त्यांना आनंदा, नंदू, गोविंदा ही तीन मुले व लीला, सुमन या दोन मुली अशी पाच अपत्ये झाली. संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना त्यांना तरुणपणीच वैधव्य आले व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. मात्र, खंबीर मनाच्या चंद्रभागा शांतपणे संकटात उभ्या राहिल्या. त्यांनी घरी असलेल्या म्हशींच्या दूध-दुभत्याशी नाते जोडले.

भल्यापहाटे म्हशीचे दूध काढून दूधविक्रीनंतर तावणीत दही लावणे व दह्याचा हंडा डोक्‍यावर घेऊन पैदल पुसद शहर गाठणे. दहीविक्रीनंतर दुपारी घरी परतणे, हा तिचा दिनक्रम बनला. गेल्या 35 वर्षांपासून चंद्रभागा यांचा दहीहंडा जणू मित्र बनला आहे. लुगड्याचा पदर सावरला की, डोक्‍यावर दहीहंडा घेत पुसदमधील नवीन पुसद, मोतीनगर अशा वसाहतीत दहीविक्री करीत आहेत. 

या दहीविक्रीच्या व्यवसायातूनच त्यांनी अडलेला संसार सावरला. दोन मुलींची व दोन मुलांची लग्ने उरकली. त्यांचा मुलगा गोविंदा दिव्यांग आहे. घरी सुना, नातवंडे आहेत. मात्र, चंद्रभागा अजून थकलेल्या नाहीत. आता त्या पैदल वारी न करता ऑटो रिक्षाने पुसद दररोज गाठतात व दहीविक्रीतून रोज किमान तीनशे ते चारशे रुपये कष्टाची कमाई मिळवितात. त्यांचा एक मुलगा रसवंती चालवितो, तर दुसरा तीन दुभत्या म्हशींचे राखण करतो.

कष्टाशिवाय जीवनात मजा नाही

सुरुवातीपासून लोणी व दहीविक्री करीत असल्याने त्यांच्या गुणवत्तापूर्ण दह्याला ग्राहकांची मागणी आहे. शहरातील ग्राहक चंद्रभागा आजीच्या दह्याची वाट बघतात. दोन-तीन तासांत दह्याची विक्री झाली की, चंद्रभागाची पावले कोपरातील संसाराकडे आपोआपच वळतात. त्यांच्याशी संवाद साधला असता, चंद्रभागा म्हणाल्या की, "बापू, दही विकून संसार भागला. आता नातवंडही मोठे झाले. पण दह्याचा हंडा डोक्‍यावर घेतल्याशिवाय करमत नाही. कष्टाशिवाय जीवनात मजा नाही". तिच्या जीवनातील कष्टाचा हा जागर नवरात्रीत 'उदे गं चंद्रभागे उदे' असा जयघोष केल्याशिवाय पूर्ण होणार नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT