Chandrapur : वाघाच्या हल्यात महिला गंभीर जखमी sakal media
विदर्भ

Chandrapur : वाघाच्या हल्यात महिला गंभीर जखमी

पोंभूर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चेकहत्तीबोळी शेतशिवारात बोर्डा बोरकर येथील देवेंद्र कुनघाडकर यांचे शेत असून शेतात धानकापणीचे काम सुरू होते

सकाळ वृत्तसेवा

पोंभूर्णा : भावाकडे भाऊबीजसाठी बोर्डा बोरकर येथे आलेल्या चेकहत्तीबोडी येथील भावाच्या शेतात धान कापणीचे काम पाहण्यासाठी गेलेल्या महिलेवर शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना १५ नोव्हेंबर दुपारी १२:३० च्या सुमारास घडली. कांताबाई रामदास चलाख वय ६० वर्षे असे जखमी महिलेचे नाव असून ती मूल तालुक्यातील सिंथळा येथील रहिवासी आहे.

पोंभूर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चेकहत्तीबोळी शेतशिवारात बोर्डा बोरकर येथील देवेंद्र कुनघाडकर यांचे शेत असून शेतात धानकापणीचे काम सुरू होते. भाऊबीजेसाठी आलेली बहिण आपल्या भावाच्या शेतात धान कापणीचे काम पाहणीसाठी गेली असता शेतातील पारीवर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने सदर महिलेवर हल्ला चढवून गंभीर जखमी केले.

मात्र, महिलेनी आरडाओरड केल्याने शेतात काम करीत असलेल्या मजूराने वाघाच्या दिशेने धाव घेतले असता वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला या हल्यात सदर महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे दाखल करून उपचार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT