free mask.jpg
free mask.jpg 
विदर्भ

कोरोनाग्रस्तांसाठी ‘उमेद’; या महिला बनल्या वॉरियर्स

सकाळ वृत्तसेवा

जळगाव (जा.) (जि.बुलडाणा) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती जळगावच्यावतीने कोरोना या संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गट विकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वलाताई पाटील, पंचायत विस्तार अधिकारी संदीप मोरे यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या यंत्रणेमार्फत विविध उपाय योजना केलेले आहेत. यामध्ये तालुका अभियान कक्ष जळगाव जामोद व कार्यरत अधिकारी आर. सी. शेख ह्याचे स्वयंसहायता समुहातील महिलांनी सुद्धा भरीव योगदान दिले. 

याकरिता जिल्हा स्तरावरून मु.का.अ. व प्रकल्प संचालक तायडे व डीएमएम यांचे मार्गदर्शनानुसार समूहातील महिलांकडून मास्क तयार करण्याचे सूचित केले. या करिता समूहातील महिलांकडून गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचे उपस्थितीत गटाचे मास्कचे सॅम्पल तयार करून घेऊन त्यांनी केलेल्या सूचनेनुसार गाव पातळीवर कोरोना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे. विविध गावामध्ये महिलांनी आपल्यापरीने मास्क तयार करून सामाजिक बांधिलकी जोपासत 500 मास्क विनामूल्य वितरणाकरिता ग्रामपंचायतला दिले व गावातील लोकांनी मास्क वापर करावा हा संदेश या मधून दिला. 

या कामाकरिता तालुक्यातील एकूण 120 महिला शिवण काम करतात. यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतकडून मास्क तयार करणे करिता आदेश मिळाला आहे. उमेद अभियाना अंतर्गत स्थापन झालेल्या 15 महिला सहायता समूहातील एकूण 120 महिला शिवण काम करत असून, आज पर्यंत एकूण 4025 मास्क निर्मिती केली आहे. 3525 मास्क अतिशय कमी दराने उपलब्ध करून देण्यात येत आहे. या करिता आवश्यक असणारा कापड लॉकडाउनच्या काळात मिळणे कठीण झाल्याने उपरोक्त मागणी व कोरोना रोखण्यासाठी तहसीलदार डॉ. शिवाजी राव मगर यांनी 30 मिनिटांची परवानगी देऊन दुकानातून कापड उपलब्ध करून देण्याकरिता भरीव मदत केली. तसेच येथील कापड कमी पडत असल्याने शेख यांनी खामगाव गाठून तेथून कापड मिळवून दिले.

या बिकट समयी सर्व यंत्रणा कार्यरत असताना समूहातील महिला कॅडर अतोनात मेहनत घेऊन काम करीत आहेत व पुढील मास्क पुरवठा करण्याकरिता प्रयत्नरत असून, दहा सूत्री मध्ये नमूद बाबी महिलांचे मनावर बिबविण्यात आल्याने कोरोना साथीत स्वच्छता त्यानी अंगिकारली असून, मुख्यमंत्री यांचे आवाहनाला प्रतिसाद देत आहेत व जिल्हा स्तरावरून महिलांना कोरोना साथीत लढणाऱ्या कर्मचारी बांधावाकरिता गाऊन शिवण्याचे काम सुध्दा लवकरच मिळणार आहे. मास्क निर्मितीच्या कामासाठी कोरोना वारियर्स म्हणून विनोद शेगोकार (तालुका व्यवस्थापक), राजगोविंद मडावी (प्रभाग समन्वयक), संगीता दलाल, हर्षा बोडके जामोद, अनुराधा कोथळकर, मीना कापरे सुनगाव, शोभाताई हिवरकार धानोरा, शालिनी वानखडे, जयश्री वानखडे वडशिंगी, राधा खापट, पिंपळगाव काळे, शीला गायकी पळशी सुपो यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. 

स्वयंसहायता समूह केवळ बचतीपुरतेच आणि पैसा मिळविण्यासाठीच तयार करायचे असतात. असा चुकीचा गैरसमज कोणाचाही असेल तर तो सोडून द्या, आज कोरोना विषाणूया भयंकर अशा परिस्थितीत जे कोणीच करू शकत नाहीत ते डॉक्टर, नर्स, आशावर्कर नंतर महिला स्वयंसहायता समूह शासनाला सहकार्य करत आहेत आणि हीच आमच्या महिला स्वयंसहायता समूहांची खरी ताकद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT