phc e sakal
विदर्भ

'ती' प्रसूतीच्या वेदनेनं विव्हळतं होती, पण डॉक्टरच नसल्यानं रुग्णावाहिकेतच झाली प्रसूती

सकाळ वृत्तसेवा

चामोर्शी (जि. गडचिरोली) : चामोर्शी तालुक्‍यातील रेगडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही डॉक्‍टरच उपलब्ध नसल्याने येथील 26 वर्षीय गर्भवती महिलेची तालुकास्थळी चामोर्शीकडे जात असताना रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली.

या आरोग्य केंद्रात एक नियमित डॉक्‍टर आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या भयंकर काळातही हे डॉक्‍टर गैरहजर असल्याने रुग्णांचे मोठे हाल सुरू आहेत. डॉक्‍टर नसल्याने आरोग्य केंद्रातील कंपाउंडर आणि नर्स याच रुग्णांना तपासत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रेगडीसारख्या दुर्गम भागात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. शुक्रवार (ता. 30) एक गर्भवती प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आली होती. पण, येथे डॉक्‍टरच उपस्थित नसल्याने तिला चामोर्शीकडे जावे लागले. मात्र, प्रसूतीकळा वाढत असताना रुग्णवाहिकेतच तिची प्रसूती झाली. सुदैवाने महिला व बाळ सुखरूप आहे. मात्र, ऐन वेळेवर डॉक्‍टर उपस्थित नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गरंजी, वेंगणूर, विकासपल्ली आदी गावातील रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, डॉक्‍टर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे उपचाराअभावी रुग्णांना परत जावे लागत आहे. सध्या हे डॉक्‍टर सुटीवर असल्याचे कळते. पण, अशा कोरोनाच्या काळात या डॉक्‍टरांना सुटी कशी काय दिली व पर्यायी व्यवस्था का केली नाही, असे प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णांना योग्य उपचार द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

'या घटनेबद्दल मी स्वत: माहिती घेईल. त्यानंतर योग्य ती चौकशी करून कुणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल.'
- डॉ. लायबर, तालुका आरोग्य अधिकारी, चामोर्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT