work of road stopped due to lack of labors watch video of village people  
विदर्भ

Video: तब्बल ९ वर्षांपासून 'हे' गाव करतंय रस्त्याच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा..पण नागरिकांच्या नशिबी चिखलच.. वाचा सविस्तर 

साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर: महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०११ मध्ये भद्रावती तालुक्यातील पिपरी-घोनाड या पांदण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र या रस्त्याचे काम तब्बल ९ वर्षांआधी  थांबवण्यात आल्यामुळे इथल्या नागरिकांना सतत पायपीट करावी लागत आहे.  

२०११ मध्ये भद्रावती तालुक्यातील पिपरी येथे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. पिपरी ते घोनड या सुमारे दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी २५ लाख २७ हजार ९६० रुपये मंजूर करण्यात आले. भूमिपूजनानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात देखील झाली. 

मजुरांनी दिला नकार 

या कामावर गावातील जॉबकार्डधारक येऊ लागले. सुमारे आठ दिवस काम सुरू होते. लाखोंचा निधी उपलब्ध झाला. कामही सुरू झाले. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची पांदण रस्त्याची मागणी पूर्णत्वास जाऊन चिखलातील पाऊले बाहेर येतील, असे गावकऱ्यांना वाटू लागले होते. मात्र, अचानक या कामावर येण्यास मजुरांनी नकार दर्शविला. 

कमी मजुरी आणि काम बंद

या कामासाठी २५ लाख २७ हजार ९६० रुपयांचा निधी मंजूर झाला होता. भूमिपूजनानंतर सुमारे ८ दिवस काम सुरू होते. मात्र, नंतर मजुरांनी कमी मजुरी असल्याचे कारण समोर करीत कामावर येणे बंद केले. त्यानंतर या कामासाठी मजूर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे मागील ९ वर्षांपासून रस्ता पूर्णत्वाचे स्वप्न बघत आहे. तर, गावकरी चिखल तुडवित शेतात जात आहेत. शेतातील मजुरी ही या मजुरीपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी कारण दिले. हे काम मनुष्यबळाने करायचे असल्याने यंत्राद्वारे करताना अडचण निर्माण झाली आणि काम कायमचे थांबले. 

निधी मंजूर झाला पण...

गावचे विद्यमान उपसरपंच संदीप कुटेमाटे यांच्याकडेच कामाची सुरुवात झाली त्यावेळेस प्रभारी सरपंचपदाची जबाबदारी होती. त्यानंतर त्यांनी रस्त्याच्या पूर्णत्वासासाठी पाठपुरावा केला. मात्र, अजूनही प्रशासकीय यंत्रणा जागी झाली नाही. त्यामुळे निधी मंजूर होऊनही मजुरांअभावी पांदण रस्त्याचे काम पूर्णत्वास जाऊ शकले नसल्याची खंत गावकऱ्यांमध्ये आहे. 

शेतातील मजुरी रोहयो मजुरीपेक्षा जास्त 
रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड आहे. या रस्त्याच्या कामावर सुरुवातीला गेलो होतो. मात्र, या परिसरातील शेतातील मजुरी ही रोहयो मजुरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच अनेक मजूर रोहयोपेक्षा शेतातील मजुरीच्या कामाला प्राधान्य देतात.
- शंकर नगराळे, 
मजूर, पिपरी.

यंत्राद्वारे सुविधा करून द्यावी
पिपरी-घोनाड या पांदण रस्त्याच्या कामासाठी सुमारे २५ लाखांचा निधी आला होता. मात्र, कामावर मजूर उपलब्ध होत नसल्याने काम थांबले आहे. मागील ९ वर्षांपासूनची स्थिती कायम आहे. त्यामुळे संबंधित विभागाने हे काम मनुष्यबळाने न करता यंत्राद्वारे करून नागरिकांची सुविधा करून द्यावी.
- संदीप कुटेमाटे,
उपसरपंच, पिपरी (भद्रावती)

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल, मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT