Workers are get injured while constructing slab in Amravati  
विदर्भ

घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज  

संतोष ताकपिरे

अमरावती ः घराच्या मागील बाजूने स्लॅब टाकण्यासाठी आलेल्या मजुरांनी वर माल चढविण्यासाठी पाइप जोडणी सुरू केली होती. परंतु त्याच्या मुळाशी असलेला ढाचाच कोसळल्याने खाली कोसळून काम करणारे तीन मजूर जखमी झाले. सोमवारी (ता. 14) सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

श्री. जयस्वाल यांच्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी मागील बाजूने स्लॅबचे काम असल्याने त्यासाठी वाशीम जिल्ह्याच्या कारंजालाड येथील मजूर अमरावतीत पोहोचले. त्यांनी आदल्या दिवशी कामाची पाहणी केली. आज (ता 27) काम सुरू करण्यापूर्वी वर माल चढविण्यासाठी पाइपचा मनोरा करीत होते.

अक्षय राजू वानखडे (वय 24), सतीश गिरिधारी आंबेकर (वय 18) व शंकर शालिकराव चव्हाण (वय 35, तिघेही रा. कारंजालाड, जि. वाशीम), अशी जखमी मजुरांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. जखमी मजुरांपैकी सतीशची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविले. 

त्याचवेळी मनोऱ्याचा पाया पक्का नसल्याने पाइप ओढत असताना तो कोसळला. आणि भयंकर आवाज झाला. त्यावर काम करणारे हे तीनही मजूर जखमी झाले. एकूण आठ ते दहा मजुरांना घेऊन एक कंत्राटदार अमरावतीत दाखल झाला होता. घटनेच्या वेळी सदर कंत्राटदारही हजर होता.

बांधकामाच्या ठिकाणी काम करीत असताना मजुरांच्या सुरक्षिततेची तेथे काळजी घेतल्या गेली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्याप्रकरणाची चौकशी सुरू केली.
-पुंडलिक मेश्राम, 
पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT