World Laughter Day.jpg 
विदर्भ

World Laughter Day : हसण्याचे आहेत हे फायदे; का साजरा करतात हास्य दिन?...वाचा

सागर कुटे

अकोला : सततच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या ताणतणावामुळे नागरिक हसणेच विसरत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता संपूर्ण जगात थैमान घातलेल्या ‘कोरोना’मुळे चिंतेत अधिक भर घातली आहे. अनेक रोगांवरील रामबाण उपाय असलेले हसणे चेहऱ्यावरून गायब झाले आहे. ‘कोरोना’त चिंता नाही तर काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हे चिंतेचे ढग लवकरच हटणार आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खुलणार हे विशेष.

सातत्याने आजूबाजूला वाढणारी तीव्रस्पर्धा, त्याला सामोरे जाताना येणारे अपयश, त्यामुळे तोंड द्यावे लागणाऱ्या नैराश्‍यावर प्रभावी औषध असणाऱ्या हसण्याचा सर्वांना विसर पडू लागला आहे. दैनंदिन आयुष्यात व्यक्ती मात्र आपल्या हसणे या नैसर्गिक भावनेला विसरला. दिवसभरातील कामाचा शिण उरकून घरी आल्यानंतरदेखील कुटुंबाच्या जबाबदारीत तो अडकून पडला. या सगळ्यात हसण्याकरिता त्याला निमित्त शोधावे लागत आहे.

हसण्यासाठी टीव्हीवरिल विनोदी वाहिन्या, चित्रपट, सोशल मीडियावरिल व्हिडीओचा आधार घ्यावा लागत आहे. कोरोनामुळे लोकांच्या चेहऱ्यावरिल हास्य दिसेनासे झाले आहे. हे खरंच आहे की, हसणे हा अनेक रोगांवरील रामबाण उपाय मानला जातो. सकाळी फिरायला गेल्यावर अनेकांना जोरजोरात हसताना पाहिले असेल. हा नजारा बघणे जरा विचित्र ठरू शकते. पण हे आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे. 

का साजरा करतात हास्य दिन?
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा करण्यात येतो. या दिवसाच सुरुवात मुंबईमधूनच झाली होती. हा दिवस सर्वात आधी 10 मे 1998 या दिवशी डॉ.मदन कटारिया यांनी साजरा केली होता. आज दिवसभरामध्ये जवळपास 100 देशांमध्ये मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे, लोकांना हसण्याच्या फायद्यांबाबत जागरूक करणे हाच आहे. 


हे आहेत हसण्याच्या काही फायदे

  • हसण्यामुळे शरीराला एक प्रकारे ऊर्जा मिळते. 
  • ब्लेड प्रेशर कमी होऊन, दुःख दूर करण्याचे कामही या हसण्यामुळे होते. 
  • चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहतो. 
  • हसण्यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता व संसर्गासोबत लढणारी प्रणाली सक्षम होते. 
  • आजारही दूर ठेवता येतात. 
  • ज्यांना हृदयांचा आजार आहे, अशांसाठी हसणे हे फार उपयुक्त आहे. 
  • आपली गुणवत्ताही हसण्यामुळे वाढविता येते. 
  • हसणाऱ्या व्यक्तिच्या मनात नेहमी सकारात्मक विचार येतात.
  • हसत राहिल्याने चांगले विचार येतात, वागणे सकारात्मक राहते.

हसण्याबद्दल काही गमतीशीर फॅक्टस

  • लहान बाळ दिवसभरात साधारणतः 300 वेळा हसतं.
  • प्रौढ व्यक्ती मात्र दिवसातून केवळ 20 वेळाच हसतात.
  • प्रेक्षकांपेक्षा बहुदा वक्ताच जास्त वेळा हसतो.
  • ग्रुपमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त हसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

मोठी बातमी! लोकअदालतीत तडजोडीतून निकाली निघाली १०१ कोटींची प्रकरणे; १०-१२ वर्षांपासून माहेरी असलेल्या विवाहिताही गेल्या नांदायला सासरी

SCROLL FOR NEXT