worst road construction in melghat of chikhaldara in amravati
worst road construction in melghat of chikhaldara in amravati 
विदर्भ

मेळघाटातील रस्ता बांधकामात गोलमाल, अपघात झाल्यास जबाबदार कोण?

राज इंगळे

चिखलदरा ( जि. अमरावती ) : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या  मेळघाटातील रस्ते उखडल्याने वाहनधारक तसेच पर्यटकांना ये-जा करण्यास प्रचंड त्रास होत आहे.  याची दखल घेत रस्ते बांधकामांना प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र, ही कामे करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे व्यवस्थित होण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

चिखलदरा तालुक्‍यात एकझिरा व सोनापूर गावाला जोडणारा रस्ता तसेच टेंब्रुसोंडा ते बोराळा यासह अन्य ठिकाणी जि. प. बांधक विभागामार्फत रस्त्याची कामे सुरू आहेत. मात्र, यातील बहुतांश ठिकाणी निकृष्ट साहित्य वापरले जात असल्याने रस्ते बांधकाम करण्याच्या अगोदरच उखडत आहेत. 

एकझिरा ते सोनापूर गावाला जोडणारा रस्त्याचे सध्या बांधकाम सुरू आहे. मात्र, या रस्त्यावरील गिट्टी आताच निघत आहे. एकझिरा ते सोनापूर व सोनापूर ते मोरगड रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे टेंडर काढण्यात आले होते. परंतु, अधिकारी व पदाधिकारी यांच्या आशीर्वादाने ती कामे मॅनेज करून इस्टिमेट रेटने संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले. हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत आहे. डांबर फक्त नावापुरतेच टाकल्याचे दिसते. तीन कोटऐवजी दोनच कोटमध्ये रस्त्यावर डांबर टाकून गुंडाळणे सुरू आहे. क्रशरच्या गिट्टीऐवजी आजूबाजूचीच लाल मुरमाळ गिट्टी टाकली जात आहे. काम लपविण्याकरिता जेसीबीने नाली खोदून मातीने साइड बुजविणे सुरू आहेत. रोडची जाडी (थिकनेस) एकदम कमी असून नियमाने हार्डमिक्‍स आवश्‍यक आहे, पण कसेतरी लिपापोती करून सदर कामे केली जात आहेत. एकझिरा ते सोनापूर डांबरी रस्त्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी नागरिकांनी केली आहे.  

मी वारंवार त्यांना अंदाजपत्रक (इस्टिमेट) मागितले. परंतु, संबंधित कंत्राटदार व शाखा अभियंता हे टाळाटाळ करत आहेत. रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे करणार आहे.
-मनीराम भुसूम,  उपसरपंच, सोनापूर.

एकझिरा ते सोनापूर जोड रस्त्याचे काम चालू आहे. मात्र, काम चालू असतानाच या रस्त्यावरून मातीने भरलेले 10 टनांपेक्षा जास्त वजनाचे ट्रक ये-जा करीत आहेत. त्यामुळे हा रस्ता उखडत आहे. तरी मी आज प्रत्यक्षात याठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहे.
-प्रमोद ठाकरे, उपअभियंता, जि. प. बांधकाम विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT