washim 
विदर्भ

अरे व्वा..! बी-बियाणे, खते पुरवठ्यातून बेरोजागार हातांना काम!

दत्ता महल्ले

वाशीम ः खरीप हंगामात शेतकर्‍यांना बी-बियाणे, खते घेण्यासाठी शेतकर्‍यांना अडचण निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हा कृषी विभागाने बांधावर खत-बियाणे पोहचविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकर्‍यांची वेळ, श्रम व पैशाची बचत होत आहे. सोबतच गावातील पुरवठादार ग्रामसंघ व समूहातील बेरोजागार हातांना आर्थिक अडचणीच्या काळात रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे खते -बियाणे पोहचविण्याच्या माध्यमातून थोडीफार आर्थिक मिळकत देखील होत आहे. 


जिल्ह्यात खरीप हंगामात कृषी विभागाकडून चार लाख सहा हजार 234 हेक्टवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोयाबीनची लागवड ही तीन लाख 417 हेक्टवर, कापूस 19 हजार 245 हेक्टवर, तूर 54 हजार 510 हेक्टरवर, मूग आठ हजार 272 हेक्टर, उडीद 10 हजार 180 हेक्टर, ज्वारी नऊ हजार 102 हेक्टर, इतर पिके चार हजार 507 हेक्टर अशी एकूण चार लाख सहा हजार 234 हेक्टवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने 74 हजार 538 क्विंटल बियाणे, 56 हजार 290 मेट्रिक टन खतांचा लक्षांक ठेवण्यात आला आहे.

मागणीनुसार खते व बियाणे देखील उपलब्ध होत आहेत. काही शेतकरी स्वतः दुकानदारांकडून खते व बियाणे खरेदी करीत आहेत. तर काही शेतकरी बांधव कृषी विभागा,  ग्रामसंघ, समूहाकडे खते व बियाण्याची मागणी नोंदवत आहेत. त्यामुळे अशा शेतकरी बांधवांना थेट शेताच्या बांधावर खते व बियाणे उपलब्ध करून दिल्या जात आहे. सोबतच हे खते व बियाणे उपलब्ध करून दिल्याच्या मोबदल्यात आर्थिक अडचणीच्या काळात दोन पैशांची मिळकत देखील होत आहे. यामध्ये शेतकर्‍यांचा वेळ, पैसा व श्रम वाचत आहेत. तर ग्रामसंघ व समूहांना सुद्धा रोजगार उपलब्ध झाला आहे. 

एवढा झाला खत-बियाण्याचा पुरवठा
जिल्ह्यात मंगळवार (ता.2) पर्यंत ग्रामसंघ, समूहाकडे खत-बियाण्यांची मागणी नोंदविलेल्या शेतकर्‍यांना घरपोच पुरवठा करण्यात आला. यामध्ये 8 हजार 116 मेट्रिक टन खते, तर 14 हजार 567 क्विंटल बियाणे शेतकर्‍यांकडे पोहचविण्यात आले. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांनी दिली आहे. 

खते -बियाणे पुरवठ्यात यांचा सहभाग
तालुका......ग्रामसंघ......समूह......शेतकरी कुटुंब
मालेगाव ......13........74.............389
मानोरा.........12........67..............268
रिसोड..........16.......112............ 560
वाशीम.........15........118............590
कारंजा ........17........113............565
मंगरुळपीर....13........87.............435
एकूण ..........86.......571...........2807

शेतकर्‍यांना बांधावर खते व बियाणे मिळत आहे. त्यामुळे एकेक शेतकर्‍याला बियाणे, खते खरेदीसाठी जाण्याचे काम नाही. खते, बियाण्याची मागणी नोंदविल्यानंतर ग्रामसंघ किंवा समूह एकत्रितरित्या खते, बियाणे घेऊन येतात. यामामध्यातून शेतकर्‍यांचा वेळ, श्रम व पैसा वाचतो. तसेच ग्रामसंघ, समूहातील सदस्यांना रोजगार उपलब्ध होऊन थोडीफार आर्थिक मिळकत होते. तर सर्वांत महत्त्वाचे कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने कृषी निविष्ठा विक्रीच्या दुकानांवरील गर्दी कमी होते.
-एस. एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT