wrong to collect monthly installment forcefully from school van drivers says nagpur district collector  
विदर्भ

Exclusive : 'स्कूल व्हॅन' चालकांनो चिंता नको, आता वाहनकर्जाचे हप्ते फेडण्यासाठी होणार नाही दमदाटी

नरेंद्र चोरे

नागपूर : कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारे शेकडो स्कूल व्हॅन चालक आर्थिक अडचणीत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत त्यांना वाहनकर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सक्ती किंवा दमदाटी करू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील बँका व वित्तीय संस्थांना दिले. 

मार्चमध्ये लॉकडाउन लागल्यापासून शहरातील सात हजार स्कूल व्हॅन चालक आर्थिक संकटात आहेत. जवळपास आठ महिने होऊनही अजूनपर्यंत शाळा सुरू झाल्या नाही. त्यामुळे सर्व स्कूल व्हॅन चालक घरी बसले आहेत. शाळा अचानक बंद झाल्याने अनेक पालकांनी पैसे दिले नाही. हाताला कामे व उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. एकीकडे त्यांचा पोट भरण्यासाठी संघर्ष सुरू असताना, दुसरीकडे वाहनांसाठी घेतलेल्या कर्जासाठी बँका व वित्तीय संस्था सारखा तगादा लावत आहेत. वसुली एजंटद्वारे दमदाटी करून मानसिक छळ करीत आहेत. त्यामुळे स्कूल व्हॅन चालक दुहेरी संकटात आहेत. 

स्कूल व्हॅन चालकांनी आपल्या समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालून मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली होती. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. 'सकाळ'नेही २४ ऑक्टोबरला स्कूल व्हॅन चालकांच्या व्यथा ठळकपणे मांडल्या होत्या. सोलापूरमध्ये घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर बँकांच्या कर्जवसुलीला (मासिक हप्ते) स्थगिती द्यावी, अशी मागणी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष अफसर खान, सचिव प्रकाश देवतळे व दीपक साने यांनी अलीकडेच जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आदेश दिले. सध्या अडचणीत सापडलेल्या कर्जदार स्कूल व्हॅन चालकांना कर्जासाठी छळ करणे चुकीचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय, वाणिज्य, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहे. या निर्णयाबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh protests : बांगलादेशात पुन्हा असंतोषाचा उद्रेक! वेतनवाढीसाठी हजारो कामगार रस्त्यावर; ढाका-गाझीपूरमध्ये जाळपोळ

Nagpur Sarafa Bishnoi Gang Threat : नागपुरातील सराफांना बिश्नोई टोळीची धमकी, व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण

Drought Resistant Crop: दुष्काळात शेतकऱ्याला ओव्याचा आधार; कमी पाण्यात, कमी खर्चात हमखास उत्पन्नाची आशा

Pali Nagar Panchayat: करवाढीपूर्वी विकासकामांचा हिशेब द्या! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीवर २ नोव्हेंबरला धडकणार ‘संघर्ष मोर्चा’

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

SCROLL FOR NEXT