सुनील डीवरे  Sakal
विदर्भ

यवतमाळ बाजार समिती संचालक सुनील डीवरे यांचा घरात घुसून खून

घरात घुसून अनोळखी व्यक्तींनी सुनील डीवरे यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूरज पाटील

यवतमाळ : यवतमाळ बाजार समितीचे संचालक व शिवसेना कार्यकर्ते सुनील डीवरे यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. या घटनेने भाम्ब (राजा) या गावात चांगलीच खळबळ उडाली आहे. (Vidarbh Crime News)

यवतमाळ तालुक्यातील भांब (राजा) या गावात घरात घुसून अनोळखी व्यक्तींनी सुनील डीवरे यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही घटना रात्री आठदरम्यान घडली. डीवरे हे यवतमाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवसेनेचे नेते होते. त्यांची मास्क घालून आलेल्या 2 ते 3 तरुणांनी गोळ्या झाडून हत्या केली.

गंभीर जखमी झालेल्या डिवरे यांना यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गावातील काही लोकांनी हा खून केल्याचा आरोप केला जात आहे. यवतमाळ ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढिल तपास ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

नातेवाईक व चाहत्यांनी गर्दी

तिघांनी गोळीबार केल्यानंतर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण खून केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. त्यांना येथील शासकीय रुग्णालयात आणले असताना त्यांच्या नातेवाईक व चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत समुद्राला उधाण, किनारपट्टी भागात उंच लाटा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

SCROLL FOR NEXT