विदर्भ

Yavatmal News: पोटाचा त्रास होत असल्याने नवजात शिशूच्या पोटाला बिब्याचे तेल लावल्याने प्रकृती चिंताजनक

पारवा पोलिसांनी मेडिकलमध्ये नातेवाइकांचे जबाब नोंदविले

सकाळ डिजिटल टीम

यवतमाळ: नवजात शिशूला पोटदुखीचा त्रास होत असल्याने नातेवाइकांनी बिब्याचे तेल लावल्याने ते उबजले. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या नवजात शिशूची प्रकृती चिंताजनक आहे.

घाटंजी तालुक्यात एका नवजात शिशूला पोटाचा त्रास होत असल्याने पालकांनी ज्येष्ठांच्या सांगण्यावर विश्‍वास ठेवून बिब्ब्याचे तेल काढून लावले. त्यामुळे नवजात शिशूची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.

घाटंजी तालुक्यातील पारवा पीएचसीमध्ये प्रसूती झाल्यानंतर आईवडील मुलीला घरी घेऊन गेले होते. मात्र बाळ रडतेय म्हणून घरच्यांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता ज्येष्ठ मंडळींनी सांगितलेल्या अघोरी प्रकारचा प्रयोग केला.

नवजात शिशूची प्रकृती खालावल्यामुळे घाबरलेल्या पालकांनी शिशूला मंगळवारी (ता.१३) उपचारासाठी यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. शिशूला वाचविण्यासाठी डॉक्टरांच्या पथकाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.

पाच दिवसांपासून उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती बालरोग विभागप्रमुख डॉ. अजय केशवानी यांनी दिली. दरम्यान, रविवारी (ता.१८) पारवा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी रुग्णालयात येऊन नातेवाइकांचे बयाण नोंदविले.

नवजात शिशूला त्रास होत असल्याने बिब्याच्या तेलाचे दोन ठिबके लावण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या मालिशमुळे तेल उबजले. शिशूला न्यूमोनिया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आज नातेवाइकांचे बयाण नोंदविण्यात आले.

विनोद चव्हाण, ठाणेदार, पारवा पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT