Vidarbha Sakal
विदर्भ

यवतमाळ : दरोड्याची तक्रार देणाराच निघाला खरा सूत्रधार

मारहाणीचाही होता आरोप; पोलिसांकडून इंट्रॉगेशन कौशल्याचा वापर

सूरज पाटील

यवतमाळ : दुचाकीने बॅगमध्ये रोकड घेऊन जात असताना सहा जणांनी दोघांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. तसेच तीन लाख 20 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लुटून पोबारा केला. ही घटना गुरुवारी अकोलाबाजार ते बोरगाव रोडवर दुपारी सव्वाबारा वाजता घडली, असा बनाव करून दरोड्याची तक्रार देणाराच खरा सूत्रधार निघाला.

अजय राजू तायकोटे (वय 27, रा. सावरगड) असे सूत्रधाराचे नाव आहे. तो मागील तीन वर्षांपासून ऊस तोडणीसाठी साखर कारखान्याला मजूर पाठविण्याचे काम करीत आहे. साडभाऊ रामेश्‍वर गुळये (रा. पिंपळदरी, जि. हिंगोली) हादेखील मजूर पाठविण्याचे काम करतो. त्यामुळे तरुणाने चार महिन्यांपूर्वी चार लाख रुपये साडभावाला मागितले होते. गुरुवारी दोघेही तीन लाख 20 हजार रुपयांची रोकड बॅगमध्ये घेऊन अकोलाबाजार येथून घोटीकडे जात होते. सहा जणांनी रस्त्यात दोघांनाही अडवून मारहाण केली. जबरदस्तीने रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला.

याप्रकरणी अजय तायकोटे याने वडगाव जंगल पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अनोळखी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी अपर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी एलसीबीच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. साडभावाला गुन्ह्याबाबत विचारणा केली असता, देहबोली व बोलण्याच्या पद्घतीत तफावत आढळली. एलसीबी पथकाने इंट्रॉगेशन कौशल्याचा वापर केला. तायकोटे याने भाऊ व मित्राच्या मदतीने दरोड्याचा कट रचला. घटनास्थळावरूनच फिर्यादीला ताब्यात घेतले. वडगाव जंगल, अवधूतवाडी व एलसीबीच्या पथकाने पाच जणांना अटक केली. या गुन्ह्यातील अन्य दोघे फरार आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक प्रदीपसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पवन राठोड, सपोनि विवेक देशमुख यांच्यासह पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT