विदर्भ

Video : शाळेसाठी तराफ्यावर बसून, ४० विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

सकाळ डिजिटल टीम

यवतमाळ : डिजिटल इंडियाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतात शाळकरी मुलांना रोज धोकादायक प्रवास करावा लागण्याच्या अनेक घटना आपल्याला देशात पहायला मिळतात. यवतमाळ जिल्ह्यात जवळपास ४० विद्यार्थ्यांना रोज असा धोकादायक प्रवास करावा लागतो.

जीवघेणा प्रवास
उमरखेड तालुक्यातील सीमेवरील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. चातारी गावाजवळ पैनगंगा नदी वाहते. याच नदीच्या पलीकडे नांदेड जिल्हा तर, अलीकडे यवतमाळ जिल्हा आहे. पावसाळ्यात ही नदी दुथडी भरून वाहते. नांदेड जिल्ह्यातील  दिघी आणि लगतच्या तीन चार गावांतील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी चातारी येथे यावे लागते. त्यासाठी ही शाळकरी मुलं तराफ्यावर बसून, शिक्षणासाठी असा धोकादायक प्रवास करावा लागतो.

मुलांचा प्रवास सुखकर व्हावा
गेल्या अनेक वर्षांपासून या नदीवर पूल व्हावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. मात्र, याकडे कुणीच लक्ष दिले नाही, असे गावकरी सांगतात. दिघी आणि लगतच्या गावांतील विद्यार्थी चातारीला शिक्षणासाठी येतात. दुसरीकडून चातारीला येण्यासाठी दीड किलोमीटरवरून आणि शेतातून वाट काढत यावे लागते. त्यामुळे विद्यार्थी या नदी पात्रातून येतात त्यांचा प्रवास अडचणीचा असल्याचे पालक सांगतात. गेल्या अनेक वर्षांपासून असा प्रवास सुरू असून रोज 35 ते 40 विद्यार्थी असा प्रवास करतात त्यामुळे हा धोकादायक प्रवास सुखकर व्हावा, अशी मागणी गावकऱ्यांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT