file photo 
विदर्भ

घरात सुरू होती अंत्यसंस्काराची तयारी अन्‌ बसला दुसरा धक्का...

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : नेरड येथील प्रतिष्ठित नागरिक मारोती लेडांगे यांना दररोज आपल्या शेतात फेरफटका मारण्याची सवय होती. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ते शेतात फिरण्यासाठी गेले. मात्र त्यांना तेथे अचानक भोवळ आली.

त्यामुळे ते खाली कोसळले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना घरी आणले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली होती.

लहान भावाच्या मृत्यूचा आघात

लहान भावाच्या आकस्मिक मृत्यूचा आघात मोठ्या भावाला सहन झाला नाही. त्यांचे मन गहिवरून आले. घरात दु:खाचे वातावरण होते. दुपारी अंत्ययात्रेची तयारी सुरू असताना मोठा भाऊ महादेव लेडांगे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय आणि गावकरी हळहळले. त्यानंतर दोघांचीही अंत्ययात्रा एकत्रित काढण्यात आली. 

क्लिक करा : आजोबा भाजीपाला आणायला जात असताना नातू मागून धावत आला, मग...

एकत्रित निघाली दोघांची अंत्ययात्रा

नेरड गावात बंधूप्रेमाचा असा अंत झाला. मारोती लेडांगे व महादेव लेडांगे या दोन भावंडांच्या मृत्यूने नेरड गावावर शोककळा पसरली आहे. दोघांची अंत्ययात्रा एकत्रित काढण्यात आली. मृतांच्या पश्‍चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: धारावीपासून दादरपर्यंत समस्यांची रांग! जनतेच्या अपेक्षा ‘मिनी सरकार’कडे; त्रिकोणीय लढतीने राजकीय तापमान वाढणार

CNG and PNG Rate: मोठी बातमी! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार; पण किती रुपयांनी? जाणून घ्या...

Prithviraj Chavan refuses to apologize Video : ‘’माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, मी का माफी मागू?’’ ; ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत वादग्रस्त विधानावर पृथ्वीराज चव्हाण ठाम!

एक कानाखाली आणि करिअर संपलं! कोण होता तो अभिनेता ज्याने ललिता पवार यांना कानशिलात लगावत कायमचं अधू बनवलं?

Silver Price Impact: चांदी ठरली गेमचेंजर! या उद्योगपतीची कोट्यवधींची कमाई; चांदीचे भाव वाढल्याने कंपनीचे शेअर्स रॉकेटसारखे झेपावले

SCROLL FOR NEXT