Yavatmal Boy Rudraksh Gaikwad From Market Stall to IIT esakal
विदर्भ

IIT Success Story : भाजीविक्री,हॉटेलमध्ये काम अन् आता बनणार आयआयटीयन ; भाजी विक्रेत्याच्या मुलाची यशोगाथा

Yavatmal Boy Success Story : घराण्यात कुणी दहावीसुद्धा पास नाही,पण मुलांनी शिक्षणाने गाजवलं नाव

Saisimran Ghashi

Yavatmal : देशात अत्यंत कठीण समजली जाणारी तसेच आयआयटी करिता आवश्यक असलेली जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा यवतमाळच्या एका भाजी विक्रेत्याच्या मुलाने पास केली आहे आणि आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. रुद्राक्ष गायकवाड असे त्याचे नाव असून त्याचे वडील संतोष हे यवतमाळ शहरात भाजीचा व्यवसाय करतात.

असं म्हणतात, की माणूस दृढनिश्चयी असेल तर तो काहीही करू शकतो. परिस्थिती कितीही बिकट असली तरी तो आपली यशोगाथा घडवतो. गरिबी माणसाच धैर्य तोडू शकत नाही. ज्यांची ध्येयं मजबूत असतात ते कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होण्याचा मार्ग शोधतात.

संतोष गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळात भाजीचा व्यवसाय करतात. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्यामुळे संतोष यांना लहान वयात हॉटेलमध्ये काम करावे लागले.

अत्यंत संघर्षमय जीवन जगत असल्यामुळे इच्छा असतानाही त्यांना चांगले शिक्षण घेता आले नाही. ते चौथी पास आहेत. विशेष म्हणजे गायकवाड यांच्या घराण्यात इयत्ता दहावीसुद्धा कुणी पास नाही. मात्र, संतोष यांनी भाजीचा व्यवसाय करीत पोटाला चिमटा घेत आपली मुले घडवली.

त्यांची मोठी मुलगी नागपूर येथे शासकीय दंत चिकित्सामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तर रुद्राक्षने मिळालेल्या संधीचे सोने करीत जेईई अ‍ॅडव्हान्स यशस्वीरीत्या पार केली आहे.रुद्राक्ष आपल्या यशाचे श्रेय वडील संतोष,आई छाया तसेच बहीण डॉ. धनश्री, काका सतीश यांना देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

Maharashtra Diesel Rules : डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

MLC Election: विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव! शिंदेंनंतर संकटमोचक महाजन दिल्लीला रवाना; कोणत्या जागेवर पेच वाढला?

Junnar Road Crash: डिंगोरे येथे एसटी बस–दुचाकी भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू

KKR vs DC: KL Rahul बरसला! अखेरच्या सामन्यात दिल्लीचे कोलकातासमोर मोठे लक्ष्य; पण शेवट गोड कोण करणार?

SCROLL FOR NEXT