यवतमाळ : अकराशे कोटी खर्चून शहरात भूमिगत गटार योजना पूर्ण केली जाणार आहे. योजनेचेकाम फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु झाले. असे असले तरी वर्षभऱ्यानंतरही काम 30 टक्केच्या पुढे सरकले नसून कोरोनामुळे गेल्या काही दिवसापासून काम लॉकडाऊन झाले आहे. सध्या कामांची प्रायरेटी ठरविण्यात आली असून यात पाणीपुरठ्याच्या कामाला प्रथम प्राधान्य देण्याचा सूचना असल्याने योजनेचे काय होणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पहिल्या टप्प्यात 195 कोटींच्या कामाला सुरूवात
मागील दोन वर्षांत शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कोट्यवधीचा निधी पहिल्यांदाच आला. त्यात अनेक योजनांची कामे प्रस्तावित होती. अनेक कामे पुर्ण झाली तर काही कामे अजूनही सुरु आहेत. मात्र, नियोजनाचा अभाव असल्याने कोट्यवधींच्या निधीचे नियोजन फिस्कटल्याचे दिसत आहे. शहरात अकराशे कोटी खर्चून भूमिगत गटार योजना पूर्ण केली जाणार आहे. त्याचा डीपीआर तयार केला केला. पहिल्या टप्प्यात 195 कोटींच्या कामाला सुरूवात झाली आहे. वाघापूर, पिंपळगाव, मेडिकल महाविद्यालय, धामणगाव रोड या भागात पहिल्या टप्प्यातील 158 किमीचे काम होणार आहे. दोन वर्षे कामांची मुदत आहे. असे असले तरी वर्ष लोटल्यानंतरही कामे 30 टक्केच्या पुढे सरकरलेले नाही. पहिल्या टप्प्यातील केवळ 65 किलोमीटरचे नेटवर्क तयार झाले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने सर्व कामेबंद झाली. कामावला उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार या राज्यातील मजूरांची संख्या जास्त होती. हे मजूर आता परत गेली आहेत. त्यामुळे योजनेचे काम ठप्प झाले आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे होणे गरजेचे आहे. सध्या भूमीगत गटार योजनेचे काम बंद असून केवळ पवसाळ्यापुर्वी आवश्यक असलेल्या रस्त्यांची कामे केली जात आहे. गटार योजनेची कामे झालेल्या मार्गावर खड्डे पडल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
एकानंतर एक कामासाठी खोदकाम
अमृत योजना, भूमिगत गटार, भूमिगत वीजपुरवठा, वैशिष्ट्यपूर्ण निधी, रस्ते अशा अनेक कामांसाठी निधी आला आहे. निश्चितच ही बाब शहराचे आधुनिकीकरण करण्यासाठी महत्त्वाची आहे. कोट्यवधीचा निधी असूनही नियोजन नसल्याने शहराची वाट लागल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. शहरात एकानंतर एका कामांचे खोदकाम झाल्याने शहरात रस्ते कमी, आणि खड्डेच जास्त अशी स्थिती आहे.
प्राथमिकता बदलली
कोरोनामुळे अनेकांवर संकट आली आहेत. लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. शासनाकडे निधीची अडचण जात आहे. त्यामुळे यावेळी शासनाने कामाची प्रायोरटी ठरविली आहे. नवीन कामामध्ये केवळ अत्यावश्यक कामांनाच मंजूरी दिली जात आहे. जून्या कामात प्रायोरेटी ठरविली आहे. पाणीपुरवठ्याची कामे आधी करावयाची असून गटार योजनेची कामे दुसऱ्या प्रायोरिटीवर आहेत. त्यामुळे निधी न मिळाल्यास योजना "लॉकडाऊन'होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.