gutka 
विदर्भ

आता तरी थांबावे हे व्यसन, ख-र्यामुळे हे गाव बनले आहे ’हॉटस्पॉट’

राजकुमार भीतकर

यवतमाळ : शहरात कोरोनाने छहात्तरचा आकडा पार केला. गेल्या चार दिवसांतच ही संख्या अचानक झपाट्याने 62 ने वाढली आहे. एकाच भागातील जास्तीत जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. खर्रा घोटणार्‍या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने संपर्कातील इतरही लोक बाधित झाले. या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाने डोळ्यांत तेल घालून केलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेल्याचे चित्र आज बघायला मिळत आहे.
यवतमाळात दुबई प्रवासाची पार्श्‍वभूमी असलेल्या शहरातील तीन नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासूनच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी प्रशासनावर पकड पक्की करून उपाययोजना सुरू केल्या. महसूल, आरोग्य व पोलिस विभागाची मोट बांधून त्यांनी कोरोना रुग्णांवर उपचार केले. त्यात यशही आले. दहा रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर दिल्ली प्रकरणातील आठ नागरिकांना कोरोना झाल्याचे समोर आले. त्यात उत्तरप्रदेशातील चार, पश्‍चिम बंगालमधील दोन, दिल्लीतील दोन व त्यांच्या संपर्कात आलेल्या यवतमाळातील एका वृद्ध व्यक्तीचा समावेश होता. यातील बहुतांश रुग्ण बरे होत असतानाच अचानक पवारपुर्‍यातील एका रुग्णाला कोरोना झाल्याचे निदान झाले. हा युवक या परिसरात खर्रा घोटण्याचे काम करीत होता. तसेच घरूनच खर्रा विक्रीही करीत होता. शहरातील अनेकांना त्याने खर्रा विकला. त्याच्या संपर्कात आलेल्या सात लोकांना कोरोना झाल्याची बाब एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. तर, याच परिसरातील पोलिस मेसमध्ये काम करणार्‍या एका महिलेच्या वहिनीला कोरोना झाल्याचे उघडकीस येताच अनेकांच्या पायाखालची वाळूच सरकली. तर येथील भोसा रोड, पवारपुरा, आदी भाग हा दाटीवाटीचा असून या वस्तीमध्ये कामकरी लोक राहतात. हातावर आणून पानावर खाणारे अनेक जण या भागात राहतात. त्यांना कोरोनाबाबतचे अज्ञान नडले.                                  लोकांनी कोराना हा विषयच गांभीर्याने घेतल्याचे या संकटाच्या काळातही दिसून आले नाही. ‘लॉकडाउन’ झाल्यामुळे व प्रशासनाने वेळीच या भागातील सीमा सील केल्याने यवतमाळात कोरोनाचा स्फोट होता होता वाचला. जर या भागातील सीमा सील केल्या गेल्या नसता तर या भागातील अनेकजण शहरातील विविध ठिकाणी काम करतात. त्यांच्या मुक्तसंचारामुळे शहरातील अनेकांना कोरोनाची लागण झाली असती. परंतु, जिल्हा प्रशासनाने या भागातील लोकांना घरातच बंद केल्याने कोरोनाचा संसर्ग रोखला गेला. या भागात असलेल्या हातपंपावर पाणी भरण्यासाठी गर्दी झाल्यानेही कोरोना पसरल्याचे सांगितले जाते.                                                                 शहरात मोठ्या प्रमाणात खर्रा विकला जातो. नागपूरी खर्रा येथे प्रसिद्ध आहे. काळ्या तंबाखूचा घोटलेला खर्रा येथे सर्रास मिळतो. ’लॉकडाउन’च्या काळात तर 20 रुपयांना मिळणारा खर्रा 50 रुपयांत विकला गेला. खर्रा खाणारे पानटपर्‍या बंद असल्याने पानटपरीचालकांच्या घरी जाऊन खर्रा विकत घेऊ लागले. त्यामुळे खर्रा हा संसर्गाचा प्रमुख स्रोत झाला.

पत्रकार, पोलिसही मागतात खर्रा
संचारबंदीमुळे शहरातील पानटपर्‍या बंद असल्या तरी ख-र्याचा व्यापार सुरूच आहे. हा खर्रा विकत घेण्यासाठी अनेक पोलिस व काही पत्रकार बांधवही खर्राविक्रेत्याच्या घरी चकरा मारताना आढळून आले आहेत. ख-र्यामुळे संसर्गाचा धोका अधिक असतानाहीसुशिक्षित लोकही एकदुसर्‍या जवळचा खर्रा खाताना शिकलेसवरलेले लोकं दिसत आहेत. आजार गांभीर्याने न घेतल्याने यवतमाळात केवळ खर्‍यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे.

खर्रा घोटणा-या व्यक्तिमुळे संसर्ग                                                             खर्रा घोटणारी व्यक्तीच कोरोनाग्रस्त असल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे खर्रा विक्रेत्यापासून सात लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.’
एम. देवेंदर सिंह
जिल्हाधिकारी, यवतमाळ

सविस्तर वाचा - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला झाला लॉकडाउनचा फायदा..
खर्रा विकणारी व्यक्तीच कोरोनाची वाहक
 खर्रा विकणा-याच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशासन डोळ्यांत तेल घालून काम करीत आहे. परंतु, लोकांच्या क्षुल्लक चुकांमुळे निरपराध नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.’
संजय राठोड,
पालकमंत्री, यवतमाळ जिल्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: विदर्भाने इतिहास घडवला! थरारक फायनल जिंकून पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

IND vs NZ, 3rd ODI: न्यूझीलंडने पहिल्यांदा भेदला भारताचा अभेद्य किल्ला! इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल, विराट कोहलीचं शतक व्यर्थ

तुम्ही सत्तेत तर याल पण...; भाजपवर जहरी टीका करत कपिल सिब्बल यांचा अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना मोठा संदेश, काय म्हणाले?

IND vs NZ, ODI: न्यूझीलंडविरुद्ध मालिका तर गमावली, आता विराट कोहली-रोहित शर्मा भारतीय संघाकडून पुन्हा कधी खेळणार?

Black Color Psychology : ज्यांना काळा रंग आवडत नाही त्या लोकांची पर्सनॅलिटी कशी असते? स्वभाव तर असा असतो की आयुष्यभर...

SCROLL FOR NEXT