पातूर (जि. अकोला) : तालुक्याची कालिफोर्निया म्हणून ओळख आहे. मात्र, गत पाच-दहा वर्षांपूर्वी शेती पिकांसाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्याने ही ओळख पूसत चालली होती. त्यावर मात करता यावी म्हणून शेतकऱ्यांनी ‘गरज ही शोधाची जणनी’ याप्रमाणे काम करण्यास सुरुवात केली अन् मोर्णा धरणाच्या पायथ्याशी त्यांनी ‘झिरो ग्राव्हिटी’ हा प्रकल्प उभारुण शेतकऱ्यांच्या बांधावर विजेशिवाय 24 तास पाणी पोहोचविले. एकंदरीतच या प्रकल्पामूळे आमचे ‘पीक वाचले’, उत्पादन वाढल्याने आमच्या पिढ्यांची सुजलाम सुफलामतेकडे वाटचाल होताना दिसत असल्याची प्रतिक्रीया शेतकऱ्यांची आहे.
विजेशिवाय मिळणार 24 तास पाणी
पातूर तालुक्याचा भाग हा विविध फळबागांनी समृद्ध आहे. संत्रा, लिंबू, मोसंबी या पिकांचे चांगले उत्पन्न या परिसरात घेतले जाते. मात्र पाण्याअभावी ही पिके जगवायची कशी हा यक्ष प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. त्यावर मात करण्याची जिद्द असलेल्या शेतकऱ्यांनी ‘एकीचे बळ’ या युक्तीप्रमाणे काम करण्यास सुरुवात केली. कोठारी गावचे आदर्श शेतकरी हिम्मतराव टप्पे आणि अभियंता हरिदास ताठे, 51 शेतकऱ्यांच्या सहभागातून 1 मे 2018 रोजी परिसरात मोर्णा धरणाच्या पाण्यावर ‘झिरो ग्रॉव्हिटी’ हा प्रकल्प निर्माण करण्याचे नियोजन आखले. त्यानूसार शेतकऱ्यांनी त्यासाठी एक कोटी 20 लाख रुपयांचा निधीही उभारला. त्यानंतर सुमारे एक वर्षांच्या अखंड परिश्रमानंतर हा प्रकल्प आता साकारल्या गेला आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना विजेशिवाय 24 पाणी मिळणार आहे.
क्लिक करा- अकोल्यातील ‘तो’ दुसरा कोरोना संशयित वाशीमचा
300 एकर होईल हिरवेगार
या प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे 300 एकर शेतीला कोणत्याही वीज आणि पंपाशिवाय 24 तास पाणी मिळणार आहे. ‘शून्य ऊर्जा’ या तत्त्वावर आधारीत असलेला हा प्रयोग महाराष्ट्रातील पहिला यशस्वी प्रयोग असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अभियंता हरिदास ताठे आणि हिम्मतराव टप्पे यांच्या परिश्रमातून मोर्णा धरणाच्या पायथ्याशी कोठारी गावाच्या शेतीपर्यंत धरणाचे पाणी कॅनल द्वारे पारंपरिक पद्धतीने न आणता थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाईपलाईनद्वारे आणून 70 टक्के पाण्याची तथा 100 टक्के विजेची बचत या माध्यमातून होणार आहे. तसेच आगामी काळात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तुषार संच, ठिबक सिंचन अथवा प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी पोहोचले जाणार आहे.
असा उतरले स्वप्न सत्यात!
कोठारी येथे 120 हेक्टरवर संत्रा मोसंबीच्या मोठ्या प्रमाणात बागा आहेत. धरणाच्या पायथ्याशी असूनही गेल्या दोन वर्षापूर्वी या भागांना योग्यवेळी पुरेसं पाणी मिळालं नव्हतं. त्यामुळे टँकरने पाणी देऊन बागा वाचवल्या होत्या. म्हणून येथील आदर्श शेतकरी हिम्मतराव टप्पे यांनी सोपीनाथ महाराज पाणी वापर संस्था स्थापन करून पाटबंधारे विभागाशी करार केला. त्याला कार्यकारी अभियंता वाकोडे, उपविभागीय अधिकारी अनिल राठोड, शाखा अभियंता गजानन अत्तरकार, मार्गदर्शक दादाराव देशमुख यांनी मोलाची साथ दिली. मोर्णा धरणातून थेट कोठारी गावापर्यंत सुमारे साडेपाच किलोमीटर पाणी आणण्याचे ठरवले मात्र यासाठी लागणारा एक कोटीहून अधिक निधी कसा उभा करावा असा प्रश्न होता. 51 शेतकऱ्यांनी त्यासाठी निधी उभा केला. तसेच बुलढाणा अर्बन या बँकेनेही मदतीचा हात पुढे केला. तेव्हा शेतकऱ्यांनी जमीन तारण देऊन या प्रकल्पासाठी पैसा उभा केला. त्यानंतर वर्षभराच्या परिश्रमानंतर हा प्रकल्प सत्यात उतरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.