file photo 
विदर्भ

यंदा विवाहांचे शुभमुहूर्त अत्यल्प; आठ महिन्यांच्या काळात ४६ लग्नतिथी

वैभव उमक

शिरजगाव बंड (जि. अमरावती) : तुळशी विवाह झाल्यानंतर लगीनघाईचे दिवस सुरू होतात. यंदा २० नोव्हेंबरपासून विवाहासाठी मुहूर्त सुरू झाले असून जूनपर्यंत ते चालणार आहेत. म्हणजेच आठ महिन्यांच्या काळात ४६ लग्नतिथी आहेत.

मे २०२१ या महिन्यात सर्वाधिक मुहूर्त असल्याने हा महिना लग्नाच्या धामधुमीचा ठरणार आहे. दिवाळी सण झाल्यानंतर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. यावर्षी डिसेंबर महिन्यापासून गुरूचा अस्त राहणार असल्यामुळे महिनाभर शुभमुहूर्त राहणार नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

यावर्षी नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात एकूण ११ मुहूर्त असल्याचे वधू-वर पित्याची आतापासूनच लगीनघाई सुरू झाली आहे. गतवर्षी गुरूचा अस्त असतानाही ८६ मुहूर्त होते. मात्र, यावर्षी गुरूचा अस्त लग्नसराईत आल्यामुळे ४६ मुहूर्त आहेत.

लग्नसराईत घरच्यांची धावाधाव

यंदा कर्तव्य असणाऱ्या घरांत दिवाळीपेक्षा लग्नसराईत घाई बघायला मिळणार आहे. यंदाच्या वर्षांत गतवर्षीपेक्षा मुहूर्त कमी असल्यामुळे लग्नकार्यासाठी मंगल कार्यालय मिळविणे अवघड ठरणार आहे. त्यासाठी आतापासूनच मंगलकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

विवाह मुहूर्ताच्या तिथी

  • नोव्हेंबर : 20,21,23,28,
  • डिसेंबर : 1,2,3,6,8,11,12
  • जानेवारी : 18,20,29,30,31
  • फेब्रुवारी : 1,4,12,14,16,20, 27,
  • मार्च : 3,4,8,11,12,19
  • एप्रिल : 15,16,26,27,
  • मे  : 2,5,6,8,12,14,17, 18, 19, 24,
  • जून : 11, 14, 15

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ३० जूनपर्यंत कर्जमाफी, ऊस ठिबक सिंचनाला प्रतिटन शंभर रुपये अनुदान : कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे

Ajit Pawar : व्यवहारात पैशाची देवाणघेवाण नाही; पुणे जमीन कथित व्यवहारप्रकरणी अजित पवार यांचे स्पष्टीकरण

आजचे राशिभविष्य - 8 नोव्हेंबर 2025

Sankshti Chaturthi 2025: कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला, भगवान गणेशाला अर्पण करा 'हे' नैवेद्य, तुम्हाला सर्व समस्यांपासून मिळेल मुक्ती

अग्रलेख : टक्केवारीचे टक्के-टोणपे!

SCROLL FOR NEXT