file photo
file photo 
विदर्भ

तरुणाई मादक पदार्थांच्या विळख्यात

सूरज पाटील

यवतमाळ : भौतिक सुख मिळविण्याचा हव्यास मानवजातीसाठी घातक ठरत आहे. अल्पवयीन मुलांसह तरुणाई मादक पदार्थाच्या विळख्यात सापडली. नशा केल्यानंतर आपण काय करतोय, याचा शुद्ध राहत नसल्याने सुखवस्तू कुटुंबातील मुले गुन्हेगारीत अडकत आहेत. औटघटकेची नशा एका व्यक्तीलाच नव्हे, तर कुटुंबाला विनाशाकडे नेत आहे.
दारू, ताडी, गांजा, चरस, भांग, अफू, गुंगी आणणारी औषधे, कफ सिरप्स, व्हाईटनरचे थिनर आदी मादक पदार्थांच्या यादीत अनेक नवीन द्रव्यांची भर पडत चालली आहे. हे पदार्थ सेवनाच्या पद्घती वेगळ्यात आहेत. यातील काही पदार्थ सिगरेटमध्ये भरून त्याचा धूर सोडला जातो. काही पदार्थ इंजेक्‍शन्सद्वारे शिरेत टोचून घेतले जातात, काही तोंडावाटे, तर काही नाकाद्वारे हुंगले जातात. या सर्व पदार्थांचे भयंकर दुष्परिणाम सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या मनावर, शरीरावर, आर्थिक स्थितीसह कुटुंबावर होतात. आजची तरुणाई मादक पदार्थाच्या विळख्यात चांगलीच अडकली आहे. 16 ते 22 वर्षे वयोगटातील मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. अल्पवयीन मुले वाईट मित्रांच्या संगतीमुळे मादक पदार्थाचे सेवन करीत आहेत. मित्रांचा दबाव व तणाव या पदार्थांबाबत असलेली कुतूहलता, नैराश्‍यामुळे व्यसन करण्यास सुरुवात होते. शहरातील मुले गांजा व व्हाईटनरच्या आहारी गेले आहे. नशेत त्यांच्या हातून खुनासारखे गंभीर गुन्हे घडले आहेत. गांजा, दारू शहरात सहज उपलब्ध होते. मोकळ्या मैदानात बसून ही मुले धूर सोडतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी गांजा पिणाऱ्यांविरुद्घ कारवाईची मोहीम उघडली.

कमी वयाच्या मुलांत व्यवसाचे प्रमाण वाढत चालले आहे. मुले जाहिराती बघतात. चित्रपटातील हिरोंना आदर्श समजतात. मित्रांच्या संगतीमुळे मुले व्यसनाची चव चाखतात आणि मग कोणताही विचार न करता कृत्य करतात. "व्यसन' हा आजार आहे. वेळेवर तज्ज्ञांची मदत घेतल्यास पुढील जीवन सुखी होऊ शकते.
- डॉ. श्रीकांत मेश्राम, मानसोपचार तज्ज्ञ, यवतमाळ.


शरीरावर होणारे दुष्परिणाम
सिगारेट ओढणे, दारू पिणे, गांजा ओढणे, व्हाईटनरची नशा, खर्रा, तंबाखू आदीमुळे दात, घसा, फुफ्फुस, ह्रदय, जठर, मूत्रपिंड, पंचनसंस्थेचे गंभीर आजार होऊ शकतो. कर्करोगाच्या रुग्णांत अलीकडच्या काळात वाढ होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT