विदर्भ

मांजाने गळा कापून युवतीचा मृत्यू; मांजाच्या बंदीचा विषय समोर

सुधीर भारती

अमरावती : दुचाकीने घरी परत जाणाऱ्या एका युवतीचा चायना मांजाने गळा चिरून मृत्यू (Death of a young woman by slitting her throat) झाला. ही घटना पुंडलिकबाबानगर परिसरात घडली. विद्या ऊर्फ सोनू शंकर गवई (वय २३) असे मृत युवतीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. गाडगेनगर पोलिसांनी आता मांजा विक्रेत्यांवर शिकंजा कसण्याची तयारी सुरू केली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा चायना मांजाच्या बंदीचा विषय समोर आला आहे. (Young-girl-Death-of-a-young-woman-by-slitting-her-throat-in-Amravati)

सोमवारी सायंकाळच्या सुमारास सोनू गवई ही रुग्णालयातील ड्यूटी आटोपून दुचाकीने घरी जात होती. याच दरम्यान पुंडलिकबाबानगराच्या परिसरात एका पतंगीचा मांजा तुटून तिच्या गळ्यात अडकला. मात्र, तिला याची कल्पना आली नाही. दुचाकीवर असल्याने लगेच मांज्याने तिचा गळा चिरला व दुचाकीसह खाली कोसळली. तिच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या.

नागरिकांनी तिला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. गाडगेनगर पोलिसांनी नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले. उपचारादरम्यान विद्या गवई हिचा मृत्यू झाला. त्यामुळे चायना मांजाच्या विक्रेत्यांबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरात चायना मांजाच्या बंदीचा फज्जा उडाल्याचे सिद्ध झाले आहे. चायना मांजावर बंदी असतानासुद्धा शहरात अनेक ठिकाणी सर्रासपणे हा मांजा विकला जातो. काही भागातील किराणा दुकानांमध्ये चायना मांजा सहजपणे विकला जात असल्याची माहिती आहे. गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

युवतीचा मृत्यू चायना मांजाने गळा चिरून झाला आहे. याबाबत आम्ही नातेवाइकांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
- आसाराम चोरमले, ठाणेदार, गाडगेनगर

(Young-girl-Death-of-a-young-woman-by-slitting-her-throat-in-Amravati)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT