A young woman from Amravati created a different identity through art
A young woman from Amravati created a different identity through art 
विदर्भ

यशोगाथा! बोटांमधून पळणाऱ्या रांगोळीचा अमरावती ते पुणे प्रवास; ओळख निर्मितीसह मिळाला रोजगार

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : शहराला लागूनच असलेल्या सुरवाडी येथील वैशाली शिंदे या तरुणीने विविध सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळी काढून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कलेच्या माध्यमातून रोजगार उभा केला आहे. तिने रांगोळी रेखाटून जनजागृती करीत तालुक्‍यात प्रथम मानदेखील मिळविला आहे. त्यामुळे तिचे सर्वच कौतुक होत आहे.

अनेकांना लहानपणापासूनच रांगोळीच्या विविध रंगांचे आकर्षण असते. मात्र, या रंगांच्या माध्यमातून आपल्या कल्पनेला गरुडझेप देणे सर्वांना जमत नाही. स्वतःच्या कलागुणात असलेला छंद जोपासला तर तोच छंद एक वेगळी ओळख व रोजगार देतो, हेच तिने प्रत्यक्षात उतरवून दाखवले. तिच्या बोटातून पळणाऱ्या रांगोळीतून नवनवीन समाज जनजागृती तसेच विविध संदेश देत असते. त्यामुळे तिच्या रांगोळीचे कौतुक होत आहे.

वैशालीला लहानपणी रांगोळीच्या रंगांचे आकर्षण होते. त्यासोबतच आपली कल्पना रांगोळीच्या माध्यमातून जमिनीवर रेखाटण्याची जिद्द होती. तिने प्रथम प्राथमिक शाळेत रांगोळी स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम पुरस्कार पटकविला होता. तेव्हापासूनच तिने आपला छंद जोपासत रांगोळीच्या रंगातून आपली चांगली ओळख निर्माण केली व रोजगारसुद्धा निर्माण केला.

शासनातर्फे सन्मान

तिवसा शहरातील यादव देशमुख महाविद्यालयाच्या शिक्षकांचे वैशालीला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. २०१५ मतदान सप्ताह कार्यक्रमानिमित्त काढलेल्या मतदान जनजागृती रांगोळी रेखटनातून तालुक्‍यातून प्रथम येण्याचा मान वैशालीनी मिळविला होता. याकरिता शासनातर्फे तिचा सन्मानसुद्धा करण्यात आला होता.

पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग

रांगोळी रेखाटून आपला छंद वैशालीने ज्याप्रमाणे जोपासला त्याच जोरावर तिने पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. अमरावती येथील वैष्णवी काळे हीदेखील सहभागी झाली होती. वैशालीने अतुल्य भारत, गजानन महाराज, शिवाजी जयंती, महाशिवरात्री अशा विविध सणानिमित्त मोठ्या रांगोळ्या रेखाटल्या आहेत.

रोजगार मिळत आहे
लहानपणापासून रांगोळीची आवड आहे. शिकत असताना विविध स्पर्धेत सहभाग घेऊन आशा मिळाली. मी नवनवीन रांगोळी रेखाटून समाज जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या काळात याच रंगांमुळे मी माझ्या कुटुंबाला आधार म्हणून हातभार लावला. आज मला चांगल्याप्रकारे यामधून रोजगार मिळत आहे. यासाठी मला तिवसा येथील यादव देशमुख महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन प्राप्त झाले.
- वैशाली शिंदे,
सुरवाडी, ता. तिवसा, जि. अमरावती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT