parshivani
parshivani 
विदर्भ

पेंच नदीपात्रातील डोहात बुडून युवकाचा मृत्यू

रूपेश खंडारे

पारशिवनी (नागपूर) : पोलिस भरतीची तयारी करणारा युवक पोहता पोहता डोहात बुडून मरण पावला. ही घटना पेंच नदी पात्रातील काळाफाटा शिवारातील डोहात बुधवारी सकाळी घडली. मृताचे नाव अरविंद कैलास राऊत ( वय १९, बाबूळवाडा) आहे.

अरविंद हा इतर पाच मित्रांसह पोलिस भरतीचा सराव करीत होता. ते नियमितपणे रस्त्यावरच सराव करीत असे. परंतू आज आपण नदीपात्रात धावू असे मत अरविंदने व्यक्त केल्यामुळे ते सर्व आज बाबूळवाडा व काळाफाटा शिवारातील पेंच नदीपात्रात आले. दौड मारल्यानंतर आपण नदीत अंघोळ करू म्हणून ते ६.३० च्या दरम्यान पाण्याजवळ आले. सुरवातीला तीन मित्र नदीत उतरले व पोहत पोहत दुसऱ्या तीरावर जाऊ लागले. ते पूर्णतः थकल्यामुळे यातील दोघांना हात धरून एकाने बाहेर काढले.

याच दरम्यान नदीतीरावर उभा असलेला अरविंद नदीत उतरला. तो पोहण्यात तरबेज नव्हता. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. अशातच तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्याकरिता एका युवकाने पाण्यात उडी घेतली. परंतू तो अरविंदला वाचविण्यात असफल ठरला. लागलीच घटनेची माहिती पारशिवनी पोलिसांना देण्यात आली. दिनेश बावने, मनिराम खंडाते व क्रिष्णा सहारे या युवकांना अवघ्या ८ मिनिटात मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात यश आले.

पोलिसदेखील घटनास्थळी पोहचले होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात नेला. अरविंद मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या निधनाने परिसर शोकाकुल झाला. मृताला एक भाऊ व एक बहीण आहे. अशीच घटना मागील आठवड्यात घोगरा येथे घडली. पेंच नदीत पुरामुळे ठिकठिकाणी डोह निर्माण झाले . डोहाचा अंदाज येत नाही. त्यामुळे पोहण्यास उतरू नये, असे सूचना फलक ठिकठिकाणी लावणे अनिवार्य आहे.

सविस्तर वाचा - महापौर संदीप जोशी म्हणाले, सिमेंट रोडचे अर्धवट कामे पूर्ण करा; नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतोय

अरविंदला व्हायचे होते पोलिस
घरची परिस्थिती हलाखीची असून परिवारात अरविंद कर्तबगार होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ बहिण आहेत. वडील रोजमजुरी करुन परिवाराचे पालणपोषण करत असल्याने आपणही वडिलांना मदत करावी, यासाठी तो सतत इतरत्र रोजगाराची कामे करीत होता. अरविंद पोलिस शिपाई होता यावे, याकरीता प्रामाणिकपणे परिश्रम घेत होता. होऊ घातलेल्या पोलिस भरतीला जाणयासाठी तो तयारी करीत होता. पण काळाने घात केला. अरविंदच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.


संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT