Arni
Arni 
विदर्भ

विषाच्या घोटाने पोरका झाला युवा शेतकऱ्याचा संसार

सचिन शिंदे

आर्णी : संघर्षांशिवाय जीवन व्यर्थ असे आपण म्हणतो, परंतु जिवनात नेहमीच संघर्ष, अपयश, दु:ख असेल तर जगणेच व्यर्थ समजुन तालुक्यातील कोसदनी गावच्या युवा शेतकऱ्याने कर्जाचा बोजा असाह्य झाल्याने गोत्यात आलेल्या व्यवहाराला कंटाळून आपली जिवन यात्रा संपवल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता घडली.

प्रयोगशील युवा शेतकरी रजनिश उर्फ बिबो अरूण तिवारी (वय ३६, कोसदनी ता. आर्णी) येथे आपली वडिलोपार्जित 20 एकर जमीन वाहत होता. त्याच्या स्वतःच्या नावाने आठ एकर सिंचनाची जमिन आहे. त्याजमिनीवर बँकेचे ६५ हजार रुपये, तसेच आई वडिलांच्या जमीनीवरील बँकेचेकर्ज व काही खाजगी कर्ज काडुन तो कुटुंब प्रमुख असल्याने तोच संपुर्ण व्यवहार करायचा. शेती वाहून आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत होता.

दरवर्षी शेतीला लागत असलेला खर्च सततची नापिकी व त्यातुन होणारे उत्पन्न यामध्ये असलेली तफावत मोठी असल्याने कर्जाचा डोंगर चढत गेला. त्यामुळे चिंतित असलेल्या रजनिशने शुक्रवारी सकाळी सात वाजता कोसदनी येथील आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून घरीच असलेल्या शौचालयात गेला. त्यातुन बाहेर आला तेव्हा त्याची प्रकृती गंभीर होती अशा अवस्थेत शेजारी युवकांनी त्याला आर्णी ग्रामीण रूग्णालयात तातडीने नेले परंतु औषध जास्त घेतले असल्याने त्याची प्राणज्योत मावळली. 

त्याच्या मागे असलेले वृद्ध आईवडील, पत्नी स्मिता, पाच वर्षांची साक्षी, दोन वर्षाची राणीचे कुटुंब मात्र पोरके झाले आहे. चिमुकल्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहुन गावातला प्रत्येक व्यक्ती हळहळला व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT