video clip 
विदर्भ

अंघोळ करीत होती महिला अन् युवकाने साधली ही संधी...

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, शेतशिवार इतकेच नव्हे तर चिमुकल्या मुली अंगणातही सुरक्षित राहिल्या नाहीत. महिलेचा अंघोळ करताना व्हिडिओ चित्रीकरण करून बळजबळीने अत्याचार करण्यात आला. ही खळबळजनक घटना दिग्रस तालुक्यातील हरसूल येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

विनोद अजाब पवार (वय 35, रा. गांधीनगर, हरसूल) असे अत्याचार करणार्‍या संशयिताचे नाव आहे. पीडित महिला घरी अंघोळ करीत असताना तरुणाने लपून तिचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर त्याने दुस-या महिलेची मदत घेतली. त्या महिलेने सदर व्हिडिओ दुसर्‍यांना दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली.

विनोदने पीडित महिलेला जबरदस्तीने एका महिलेच्या घरी बोलावून बळजबरीने अत्याचार केला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर पीडितेने गुरुवारी (ता.23) दिग्रस पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून विनोद पवार याच्याविरुद्घ गुन्हा नोंदविला. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कुणाच्या डोक्यात काय विचारचक्र चालत असेल, याचा नेम राहिला नाही. हा प्रकारदेखील असाच खळबळजनक आहे. महिलेची शत्रू महिलाच कशी अशू शकते, हेदेखील या घटनेमुळे अधोरेखित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT