youths violate corona rules by doing party in lawn at chandrapur
youths violate corona rules by doing party in lawn at chandrapur 
विदर्भ

कोरोनाच्या संसर्गात तरुणाईचा धिंगाणा, शंभरावर तरुण-तरुणीची नदीकाठावरील लॉनमध्ये पार्टी

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : इरई नदीकाठावरील एका लॉनमध्ये शंभरावर तरुण- तरुणी रेव्ह पार्टी करत असल्याची 'टीप' स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.  अंमली पदार्थ मिळेल, अशी खात्री पोलिसांना होती. पोलिसांनी तिथे छापा टाकला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे शेवटी कोरोना प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन झाल्याच्या कारणावरून दोन आयोजकांवर पोलिसांना गुन्हा दाखल केला. 'हीप-हॉप'नावाने आयोजित या पार्टीत मोठ्या संख्येत अल्पवयीन मुल-मुली सहभागी झाले होते.  

मोठ्या शहराच्या धर्तीवर चंद्रपुरातील तरुणांसाठी 'हीप-हॉप नाईट 2021'चे आयोजन करण्यात आले. इरई नदीकाठावरील बोराडे लॉन येथे रविवारी (ता. 21) रात्री दहा वाजता ही पार्टी सुरू झाली. यात प्रवेशासाठी शुल्क आकारण्यात आले. येथे येणाऱ्या प्रत्येकाला 'एन्ट्री पास' देण्यात आले. शंभरावर युवक -युवती रात्री येथे एकत्र आले. कानठळ्या बसणाऱ्या डीजेवर तरुणाई बेधुंद नाचत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी बोराडे लॉनवर छापा मारला. पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. पार्टीत मात्र एकच हल्लाकोळ माजला.

शेवटी कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून दोन आयोजकांवर गुन्हा दाखल झाला. शहरात अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली आहे. पोलिसांनी तस्करांच्या मुसक्‍या आवळणे सुरू केले आहे. या पार्टीतसुद्धा अंमली पदार्थ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याच अनुषंगाने त्यांनी छापा टाकला. कोणत्याही समारंभासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. तिथे येणाऱ्या लोकांची संख्या मर्यादीत  करण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास आयोजक आणि लॉन मालकावर गुन्हा दाखल होते. येथे मात्र पोलिसांनी आयोजकांना दोषी ठरविले. पार्टीसाठी लॉन देणाऱ्या बोराडेंवर कारवाई टाळण्यासाठी कोणत्या 'नायका'ने पुढाकार घेतला, याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

Shirpur Jain News : पार्श्वनाथच्या मंदिरात पुन्हा तुंबळ हाणामारी, दोन जण जखमी

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

Water Issue : मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटला; धरणात जलसमाधीसाठी जात असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले

SCROLL FOR NEXT