Fact Check|RPSF|RPF|Jobs  X, @PIBFactCheck
व्हायरल-सत्य

Fact Check: RPSF आणि RPF मध्ये होणार 4660 जागांसाठी भरती? जाणून घ्या व्हायरल अधिसूचनेमागील सत्य

Railway Police Force: अधिसूचनेमध्ये दावा करण्यात आला आहे की, रेल्वे भरती मंडळ RPF मधील 4660 रिक्त पदांसाठी 452 उपनिरीक्षक आणि 4208 हवालदार भरती करणार आहे

सकाळ डिजिटल टीम

Fake Notice of RPF and RPSF Jobs:

रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स (RPSF) आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये हवालदार आणि उपनिरीक्षकांच्या जागांसाठी भरती सुरू झाली असल्याचा दावा करणारी एक अधिसूचना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मात्र, पीआयबीच्या अहवालानुसार ही अधिसूचना बनावट आहे. नव-नव्या अपडेट्ससाठी उमेदवारांनी कायम अधिकृत वेबसाइटवरील सूचनांवरच विश्वास ठेवावा असा सल्ला, पीआयबी ने दिला आहे.

“रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये उपनिरिक्षक आणि हवालदारांच्या भरतीसंदर्भात रेल्वे मंत्रालयाच्या नावाने जारी केलेली बनावट अधिसूचना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेल्वे मंत्रालयाने अशी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. तुमची वैयक्तिक/आर्थिक माहिती कधीही अनोळखी लोकांशी शेअर करू नका,” अशी पोस्ट PIB Fact Check युनिटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे.

अधिसूचनेमध्ये दावा करण्यात आला आहे की, रेल्वे भरती मंडळ RPF मधील 4660 रिक्त पदांसाठी 452 उपनिरीक्षक आणि 4208 कॉन्स्टेबल भरती करणार आहे आणि अर्ज करण्याची मुदत 15 एप्रिल ते 14 मे दरम्यान असेल.

सरकारी नोकरीसाठी इच्छूकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या कोणत्याही भ्रामक आणि खोट्या माहितीला बळी न पडण्याची खबरदारी घ्यावी असे पीआयबी फॅक्ट चेक युनिटकडून सांगण्यात आले आहे.

उमेदवारांनी नेहमी परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेच्या / भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे याची पडताळणी केली पाहिजे.

फॅक्ट चेक कशी करायची?

जर तुम्हालाही सोशल मीडियावरील एखाद्या मेसेज, पोस्ट किंवा व्हिडिओबाबत शंका येत असेल, तर तुम्ही त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी PIB कडून त्याबाबतची सत्य परिस्थिती तपासू शकता.

यासाठी तुम्हाला PIB च्या अधिकृत वेबसाइट https://factcheck.pib.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.

याशिवाय, तुम्ही WhatsApp क्रमांक +918799711259 किंवा pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडीवर मेसेज किंवा व्हिडिओ पाठवून फॅक्ट चेक करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT