Fact Check Ananya Pandey and Hardik Pandya Champions Trophy Viral Photos esakal
व्हायरल-सत्य

Fact Check : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर हार्दिक पंड्या अन् अनन्या पांडेचा खोटा फोटो व्हायरल, हे आहे पोस्टमागचं सत्य

Fact Check Ananya Pandey and Hardik Pandya Champions Trophy Viral Photos : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर दुबईत अनन्या पांडे आणि हार्दिक पांडे यांनी एकमेकांना आलिंगन दिल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. यामागे काय सत्य आहे जाणून घेऊया.

Saisimran Ghashi

Created By : PTI

Translated By: Sakal Digital Team

नुकताच एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 13 मार्च 2025 रोजी एक फोटो कोलाज करून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि तो व्हायरल झाला. ज्यात बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या यांचा आलिंगन देतानाचा फोटो दाखवला गेला. यामध्ये दावा केला जात होता की, हा फोटो दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये काढलेला आहे, जिथे भारताने 9 मार्च 2025 रोजी न्यूझीलंडवर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल जिंकल्यानंतर अनन्या आणि हार्दिक एकमेकांना आलिंगन दिले होते.

Fact Check Ananya Pandey and Hardik Pandya Champions Trophy Viral Photos

पोस्टमधील दावा कोणता?

व्हायरल पोस्टमध्ये दावा केला गेला की, अनन्या पांडे आणि हार्दिक पांड्या यांनी भारताच्या न्यूझीलंडविरुद्धच्या विजयावर (आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल) दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये गळाभेट घेतली. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला की हे फोटो 9 मार्च 2025 रोजी काढले गेले आहेत.

(पोस्टची लिंक आणि archieve इथे पाहा)

Fact Check Ananya Pandey and Hardik Pandya Champions Trophy Viral Photos
Fact Check Ananya Pandey and Hardik Pandya Champions Trophy Viral Photos

पडताळणीत काय आढळले?

PTI Fact Check Desk ने या व्हायरल फोटोची तपासणी केली आणि निष्कर्ष काढला की हे फोटो AI जनरेटेड (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) होते आणि ते चुकीच्या दाव्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले गेले होते. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हे दोन्ही फोटो शेअर केलेत.

पुरावा 1

पोस्टमध्ये वापरलेले फोटो 'Google Lens' च्या माध्यमातून तपासले गेले. यावरून असे दिसून आले की, हे फोटो अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर चुकीच्या दाव्यांसोबत शेअर केले होते आणि असा कोणताच फोटो क्रिकेटर आणि अभिनेत्रीने काढलेला नाही.

पुरावा 2

पडताळणी दरम्यान, चित्रांमध्ये काही विसंगती आढळल्या. दोन्ही व्यक्तींच्या चेहऱ्यांमध्ये फरक आणि अगदीच काहीतर नकली असल्यासारखे दिसते. बॅकग्राउंड देखील अतिशय चकचकीत आणि चमकदार दिसत आहे. यामुळे हे फोटो डिजिटल तंत्रज्ञान वापरुन बदलले गेले असल्याचे दिसते.

पुरावा 3

हे फोटो 'Hive Moderation' (AI डिटेक्शन टूल) द्वारे तपासले गेले. या टूलने यावरून पुष्टी केली की या फोटोमध्ये AI-जनरेटेड कंटेंटचा जास्त प्रमाणात वापर करण्यात आलेला आहे.

निष्कर्ष

अनन्या पांडे आणि हार्दिक पांड्या यांचा एकमेकांना आलिंगन दिल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो AI जनरेटेड खोटा आहे आणि चुकीच्या दाव्यांसह शेअर केले गेले असल्याचे स्पष्ट झाले.

(PTI या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma - Virat Kohli: 'थँक यू ऑस्ट्रेलिया! परत येऊ की नाही माहित नाही, पण...', सिडनीतील विजयानंतर विराट-रोहित झाले व्यक्त

Crime: आई आणि काकाला नको त्या अवस्थेत पाहिलं; लेकाचा पारा चढला, रागाच्या भरात भलतंच घडलं

Akola Crime : हॉटेलमध्ये बोलावून तरुणाचा खून; भयावह कटाचा पर्दाफाश, मुख्य सूत्रधारासह चौघांना बेड्या

Latest Marathi News Live Update : हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे हादरे, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

Ajit Pawar: पन्नास हजार कुटुंबांची दिवाळी नव्या घरात; अजित पवार यांच्या घोषणेची बीडमध्ये पूर्तता

SCROLL FOR NEXT