Fact Check Chiplun Viral Video Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: चिपळूणमध्ये रस्त्यावर मगर फिरतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? पाहा काय आहे सत्य

Sakal Fact Check: सोशल मिडीयावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भर पावसात रस्त्याच्या मध्यभागी एक मगर फिरताना दिसत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane), आशुतोष मसगौंडे

चिपळूण : सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भर पावसात रस्त्याच्या मध्यभागी एक मगर फिरताना दिसत आहे.

हा व्हिडिओ महाराष्ट्रातील रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील शिवनदीजवळ असल्याचा दावा देखील केला जात आहे.

रस्त्यावर फिरणाऱ्या या मगरीला पाहण्यासाठी रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. या दरम्यान हा व्हिडिओ खरा आहे की, खोटा याबाबत सोशल मिडीयावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

काय आहे तथ्य?

व्हायरल झालेला हा व्हिडिओ खरा आहे की नाही हे तपासण्यासाठी ई-सकाळने गुगल रिव्हर्स इमेज आणि InVid या टूल्सचा वापर केला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मगर फिरते त्या भागातील रोडवरील काही दुकाने दिसून येत आहेत. InVid चा वापर करून आम्ही व्हिडिओमधील दुकानांची नावे तपासली. दुकानांची नावे गुगल मॅपवरती टाकले असता ती दुकाने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील चिंचनाका परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. गुगल Street View या फिचरचा यात फायदा झाला.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेले ठिकाण गुगल मॅपमध्ये शोधल्यानंतर आम्हाला दावा आणि व्हिडिओमधील ठिकाण तेच असल्याचे सापडले.
व्हायरल व्हिडिओमधील दिलखुष चणा भट्टी आणि आम्ही गुगल मॅपवर शोध घेतल्यानंतर मिळालेला रिझल्ट.

त्याचबरोबर ती मगर फिरते तिच्या मागच्या बाजूला एक दुकान आहे. त्याचे नाव आहे दिलखुष चणा भट्टी. या दुकानाचे नाव गुगल मॅपवरती शोधले असता ते रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील चिंचनाका परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले.

गुगल मॅपची लिंक येथे पाहू शकता.

निष्कर्ष

'सकाळ'ने केलेल्या फॅक्टचेकमध्ये रस्त्यावरती फिरत असलेला मगरीचा व्हिडिओ चिपळूणचा असल्याचे स्पष्ट झाले. सकाळच्या चिपळूणमधील वार्ताहरनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या भागात पावसाळ्यात मगरीचे नागरी वस्तीत दर्शन झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत, असे सकाळच्या स्थानिक वार्ताहराने सांगितले.

'शक्ति कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'सकाळ'ने हे फॅक्ट चेक केले केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

UPSC Success Story : ग्रामीण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी डॉ.भगवंत पवार यांचे UPSC CMS मध्ये ऑल इंडिया 25वी रँक!

Pune Digital Arrest : डेक्कनमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक; ७९ वर्षीय महिलेची १७ लाखांची आर्थिक हानी!

Pune Domestic Violence : हडपसर मधील घरगुती हिंसा; दोरी आणि लोखंडी गजाने पत्नीला मारण्याचा प्रयत्न!

Pune Cyber Scam : सायबर गुन्हेगारांनी पोलिस असल्याचा भास करून ज्येष्ठ नागरिकाला फसवले; बँक खात्यातून ३६ लाख रुपयांचा गंडा!

SCROLL FOR NEXT